स्वप्न वाटणारी माणसं

 *आम्ही स्वप्न वाटतो...!*

✍️ २८७६


 *विनोदकुमार महाजन* 


🩷🩷🩷🩷


होय मित्रांनो ,

आम्ही स्वप्न वाटतो.

सगळ्यांच्या सुखाची स्वप्ने पूर्ण व्हावी म्हणून आम्ही सुध्दा प्रयत्न करतो.

सगळ्यांच्या सुखासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो.


वामनराव पै यांची एक लोकप्रिय विश्व प्रार्थना आपणास माहितच आहे...

" हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे.सगळ्यांचं भलं कर , कल्याण कर.सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. "

किती छान मन असेल ना वामनराव पै यांचे ?


दुसऱ्याच्या सुखासाठी प्रार्थना करायला सुध्दा खरंच मनाचं मोठेपण असावं लागतं.


दुसऱ्यांची सगळी स्वप्नं पूर्ण व्हावी, प्रत्येक जण आनंदात रहावा , अशी वेडी स्वप्न बघणारी वेडी माणसं ही या जगात नक्कीच असतात.


" स्वप्न वाटणारी वेडी माणसं...? "


पण स्वार्थाच्या बाजारात आणी पैशाच्या नात्यामुळे हल्ली नाती पण  

" रक्त बंबाळ झालेल्या ह्रदयासारखी झाली आहेत की काय ? " 

असे वाटते. 

असो.


समाजातील एक लोकप्रिय कथा आहे.

" दोन प्रेमी असतात.ते दोघे एकमेकावर खरंखुरं प्रेम करतात.लग्नापुर्वी

आयुष्य एकत्र काढण्याच्या आणाभाका घेतात. "


आणी ?

क्रूर नियती वेगळाच डाव टाकते.?

दोघांच्या ही आयुष्य भरासाठीच्या  वाटा वेगवेगळ्या होतात.आणी ? आयुष्यभर पुन्हा कधिही न भेटण्यासाठी ते दोघे ही वेगळे होतात.?


एक वास्तव पण फिल्मी कथा ?


आणी मग चालू होतं ते आयुष्यभर लक्षात राहील असं एक फिल्मी गाणे...

" खूश रहे तू सदा...ये है मेरी दूवा..."


हे गाणं इथं मुद्दाम लिहायचं कारण असं की ,

" ते दोघे प्रेमी ? देहाने विभक्त झाले.पण मनाने , आत्म्याने एकच राहीले.आणी ? अगदी आयुष्यभरासाठी ?

एकमेकांच्या सुखासाठी ईश्वराकडे प्रार्थना करत राहीले. "


मतलब ...?

मतलब साफ है !

" दोघांचंही एकमेकावरील खरंखुरं , निस्सिम , अमर प्रेम.

त्या प्रेमातील कारूण्य आणी आर्तता. "


मग हे असंच प्रेम आपण अगदी सगळ्यांवर भरभरून केलं , संकटात एकमेकांना उभारीचे व आधाराचे, मायेचे चार शब्द दिले तर ? त्याला , ज्याच्यावर प्रेम करतो त्याला ? स्वर्गीय आनंदच होईल ना हो ?


" आणी असं निस्सिम प्रेम करायला काय पैसा लागतो का हो ? नाही ना ? "


आणी असं एकमेकांना आधार देणारं खरं प्रेमच ईश्वराला आवडते.


आणी मग ?

ईश्वर सुध्दा अशा खरंखुरं प्रेम करणा-या माणसांवर ? अगदी गुपचुपच प्रेम करायला लागतो.?


तो *श्रीकृष्ण* माहिती आहे ना आपल्याला ?

एकनाथ महाराज यांचे कडे गुप्त रूपाने *श्रीखंड्या* बनून , त्यांच्याकडे दररोज घागरीने पाणी भरायचा हो.अगदी दास होऊन.

प्रेमासाठी आणी *भक्तांसाठी दास* ?


भक्तांसाठी आणी प्रेमासाठी नोकर बनून राहणारा भगवंत खरंच किती मोठा असेल ?

" *देव भावाचा* *भुकेला..."* 


पण...?

" मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..."

असं कधी होईल का ?

ईश्वराला ही बोलता आलं पाहिजे.

नाहितर ?

नुसत्याच कोरड्या तिर्थयात्रा काय कामाच्या ?


म्हणूनच म्हणतो...

जगावर , समाजावर खरंखुरं प्रेम करत रहावं . आणी खरं प्रेम करूनही ? आपली कींमत शून्य ठरली ?धोके झालेच तर ? हिमालयात कायमचंच निघून जावं.अंगाला राख फासून.


तिथं भगवंत आपली नक्कीच वाट बघत असेल.अगदी वेडापिसा होऊन ?

मग ? आपण आणी आपला भगवंत ?

एकरूप होऊन जन्मोजन्मी एकत्र राहू या.कधिही वेगळं न होण्यासाठी ?


कदाचित...

" माणसं साथ सोडतील पण ? भगवंत जन्मोजन्मी साथ देईलच."

आणी जन्मोजन्मी *साथ*

ही राहील.


" साथ साथ...सात जनम् तक...साथ रहने का...? इंन्सानों का जमाना और वचन अब...? कुछ काम का नहीं रहा है...? "

 *यहाँ भरौसा*  ?

केवल और केवल ईश्वर का ही है...!


 *प्रभू परमात्मा भगवान* *श्रीकृष्ण की* *जय* 


👆🩷🕉️🙏

Comments