पाषाण ह्रदयी

 *पाषाण ह्रदयी...!?*

✍️ २८८०


 *विनोदकुमार महाजन* 

👆🤫❓❓


लोकसंख्या विस्फोट झाला पण ?

माणूस ? खरंच माणूस राहीला का ?

माणूस खरंच ? माणूस म्हणून जगतो का ?

एकमेकांना आधार देणं दूरचं , एकमेकांच्या कुरघोड्या काढण्यातच धन्यता मानणारा , ह्रदयातील मायेचे झरे आटलेला , पाषाण ह्रदयी , क्रूर , कठोर , संवेदनाशून्य मनुष्य प्राणी खरंच बनला आहे का ?


कुटूंब व्यवस्था उध्वस्त झाली , मनं उदास झाली , घरोघरी हताशा वाढली , मना मनातली अंतर वाढली ? हे कशाचे लक्षण आहे ?


हल्ली माणूसच माणसाला टाळतोय की काय ? असं वाटतंय.

एकमेकापासून दूर पळतोय.हताश , उदास मनाने ? एकटाच दुःखाचे सुस्कारे सोडतोय.?


कुणाचं कुणाकडे जाणं येणं नाही.मन मोकळे करून एकमेकांशी घडघडा बोलणं नाही.

संवाद तुटला , वाद पेटला , मनं ही पेटली , एकमेकांच्या इर्षेने ?

सगळीच ? पेटून उठली.?


खेडी उध्वस्त झाली , शहरं बकाल झाली , एकमेकांची आत्मीयता संपली.


कुणी एखादा दु:खातीरीकाने तडफडून मरत असला तरी ?

समाजातली दया , माया , आत्मीयता , आपुलकी संपली.


नात्यांचीही रद्दी झाली ,

आत्मीयता केराच्या टोपलीत गेली ,

एकमेकांच्या सुखदुःखाची कुणाला कसलीच खंत नाही राहीली.


नाती आटली , मनंही दुभंगली , एकटाच राहण्याची आता ? सामाजिक घडणच बनली.?


कोण होतास तू ?

काय झालास तू ?

अरे वेड्या कसा ?

वाया गेलास तू ?

अशीच सगळ्या मनुष्य प्राण्याची गत झाली.?


सगळं सगळंच आक्रीत झालं , जिकडे तिकडे विपरीत झालं , मानसाचं मनंच सगळं उध्वस्त झालं , सैरभैर झालं , 

जिकडे तिकडे माणुसकीचचं पार ? पोतेरं झालं.?


कुटुंब व्यवस्था संपली , समाज मनं उध्वस्त झाली , स्वार्थाच्या बाजाराने सगळंच थैमान घातलं.


देवा तु कुठे आहेस रे ?

निराकार रूपात तू बघतोयस का सगळं ?

संस्कृतीच पार ? वाटोळ झालं.

असंस्कृत लोकांच ? उभ्या जगातच ? जोमाचं पीक आलं.?


आता तरी देवा धावशील का ?

संस्कृतीच अंध:पतन थांबवशील का ?

अधर्माचा बाजार संपवशील का ?

धर्माची पुनर्स्थापना आता तरी तू करशील का ?

आता तरी देवा मला पावशील का ?

मेलेली मानवता पुन्हा जागवशील का ?


 *जय श्रीकृष्ण* 


🙏🕉️🚩✅

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ