देव सुध्दा धावत येईल

 *देवसुद्धा धावत येईल..*

✍️ २८७९


 *विनोदकुमार महाजन* 


✅🩷🩷🩷


खरंच मित्रांनो ,

तो सावळा श्रीहरी ,

पंढरीचा पांडुरंग...

साक्षात विठ्ठल सुध्दा ?

आपल्या प्रेमासाठी विटेवरून दुडूदुडू धावत येईल.

चिमण्या कावळे गाई म्हशी सुध्दा आपल्याशी बोलतील.

आपल्या प्रेमासाठी वेडेपिसे होतील.

कायमस्वरूपी आपलेसे होऊन जातील.


पण मनुष्य ?

थांबा...

दुष्ट मनुष्य ? क्रूर मनुष्य ? खट्ट पाषाण ह्रदयी मनुष्य ?

प्रेमासाठी वेडापिसा होईल का हो ?


नाही , सपशेल नाही.

अहो असं जर असतं ना ? तर ?

अख्या जगाला वेड लावणारा तो ? प्रभू परमात्मा श्रीकृष्ण ?

जेंव्हा दुर्योधनाकडे कृष्ण शिष्टाई साठी गेला तेंव्हा ?

काय घडलं हो ?

प्रत्यक्ष प्रभू परमात्म्याचे सुध्दा दुष्ट दुर्योधनाने ऐकले नाही.


श्रीकृष्णाला युद्ध खरंच नको होतं.

पण दुष्ट दुर्योधनाने श्रीकृष्णाच्या कृष्ण शिष्टाई ला सुध्दा धूडकावून लावले.


मग काय ? हाती कांहीच लागलं नाही म्हणून श्रीकृष्ण हताश उदास होऊन दुर्योधनापासून परत आला का ?

नाही.

भगवंत हताश उदास कसा होईल.

दुष्टांचा समूळ नाश करायचा खंबीर निर्णय घेऊनच श्रीकृष्ण परत आला.


आणी पुढे घडले ते ?

घनघोर महाभारत युद्ध आणी ?

दुष्टांचा समूळ नायनाट.


खरंच सांगा मित्रांनो ,

जर श्रीकृष्ण परत देह धारण करून आला तर ?

आजचे पावलोपावली वसलेले दुष्ट दुर्योधन , दुष्ट लोक खरंच त्या प्रभू परमात्मा श्रीकृष्णाचे ऐकतील का हो ?


अहो आजचा काळ तर किती भयावह आणी घनघोर आहे ? हे आपणासारख्या प्रत्येक सज्जन पुरूषास माहिती आहे.

वेगळे सांगण्याची गरज नाही.


आजच्या अशा भयावह परिस्थिती मध्ये , श्रीकृष्ण जर देह धारण करून आला तर ?

त्याला सुद्धा मारायला उठतील.

खरं की खोटं ते तुम्हीच सांगा.


मग आजच्या अशा अती भयावह परिस्थितीला अंतिम उत्तर काय आहे ?


आज जर श्रीकृष्ण देह धारण करून अवतरला तर काय करेल ?

उदास , हताश मनाने स्वर्गाला परत जाईल की ?

दुर्योधनाच्या वेळी जसा कठोर झाला , सत्याच्या आणी धर्माच्या विजयासाठी कर्तव्य कठोर बनला ?

तसा आजही होईल ?


आजची परिस्थिती तर अती भयावह आहे.जगाच्या कानाकोपऱ्यात अधर्माचे विनाशकारी थैमान अती भयंकर आहे.

जागोजागी ईश्वरी सिद्धांत उखडून टाकण्यासाठी ? एकाच वेळी, लाखोंच्या संख्येने, पावलोपावली, उन्मत्त, उन्मादी दुष्ट दुर्योधन, कॅंस , रावण , हिरण्यकश्यपू , जरासंध , बकासूर ?

पावलोपावली टपून बसलेले आहेत.


ईश्वरी शक्ती आणी ईश्वरी सिद्धांत चहुबाजूंनी भरडले जात आहेत ?

सज्जन शक्ती , साधू संत प्रचंड संकटात आणी अडचणीत आहेत.

स्वर्गीय देवता, गौमातेचे आक्रंदन भेसूर आहे.


मग ?

अशा भयावह स्थिती मध्ये ?

ईश्वरी शक्ती शांत , मौन आणी स्थितप्रज्ञ राहू शकेल का ?


प्रश्न सगळ्या सज्जन शक्तिला तर आहेच.

प्रत्यक्ष प्रभू परमात्मा श्रीकृष्ण याला ही माझा प्रश्न आहे.

बघू या , ईश्वर काय उत्तर देतो ते ?


निरागसतेने विचारलेल्या प्रश्नांना व निरागस शक्तीच्या रक्षणासाठी आता ?

प्रत्यक्ष भगवंताकडे काय उत्तर आहे ते आपण पाहू या...

( *समस्या कितीही* *भयावह असली तरी ?* *थंड डोक्याने* *घेतलेले* *निर्णय आणी केलेली* *अंमलबजावणी नेहमीच* *हितकारक* *ठरते -- जय श्रीकृष्ण* )


 *श्रीकृष्णार्पणमस्तू*


🙏🙏🩷✅

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ