बिपिन रावत यांना श्रध्दांजली
बिपिन रावत : - एक राष्ट्रप्रेमी व्यक्तिमत्व
बिपिन रावत यांचे हेलीकॉप्टर अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले आणी संपूर्ण देशच केवळ हळहळला नाही तर,अख्खा देशच ढवळून निघाला.
देशासाठी रावत यांचे योगदान तसे पाहता फार मोठे आहे.३७० कलम,सर्जिकल स्ट्राईक यासारख्या धडाकेबाज निर्णयामुळे रावत यांची कारकीर्द विशेष गाजली.आणी खरोखरीच देशसासाठी हे कार्य महत्वपूर्ण व आव्हानात्मक होते.त्यांच्या दुर्देवी
अपघाती निधनामुळे देशाची भयंकर हानी झाली आहे.
चिनसारखा बलाढ्य देशसुध्दा रावत यांच्या जबरदस्त रणनीती मुळे रावत यांना दबकून रहात होता.पाकिस्तान ची तर त्यांनी पार ऐसी की तैशी करून पार धुळधाण उडवून दिली होती.देशातील राष्ट्र द्रोही शक्ती पण रावत यांना दबकून होत्या. आम्ही अडीच मोर्चावर काम करतो आहोत,हे त्यांचे उद्गार विशेष उल्लेखनीय होते.चिन सारखा बलाढ्य देश,पाकिस्तान व देशातंर्गत छुपे शत्रू, असा हा अडीच शत्रूंचा मुकाबला ते खंबीरपणे करत होते.ख-या राष्ट्रप्रेमींसाठी बिपिन रावत हे विशेष कौतुकास्पद विषय होता.तर राष्ट्र द्रोह्यांसाठी ते कर्दनकाळ होते.
बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यु मुळे देशाची कधीही भरून न निघणारी फार मोठी हानी झाली आहे.
सा.सावधान हिंदुस्थान तर्फे बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
विनोदकुमार महाजन.
कार्यकारी संपादक,
सा.सावधान हिंदुस्थान.
Comments
Post a Comment