कपाळावर गंध लावणे शुभकारक

 कपाळावर गंध लावा


कपाळावर गंध असणे हे जागृतपणाचे लक्षण मानले जाते.कपाळावर गंध लावण्याचे अनेक फायदे आहेत.

एकतर.आपण आपल्या धर्माबद्दल जागरूक आहोत व आपल्याला आपल्या धर्माचा अभीमान पण आहे ,हे यावरून जाणवते.

तसेच आपली माणसे पटकन ओळखण्यास मदत होते.

गंध लावलेले पुरुष दहा माणसात विशेष पणे व ठळकपणे उठून दिसतात.

आपल्या संस्कृती चा,भारतीय असल्याचा अभिमान प्रकर्षाने त्यामुळे जाणवतो.


स्त्री जशी सौभाग्य अलंकार म्हणून कपाळावर कुंकू लावते,आणी ते कुंकू अभिमानाने कपाळावर मिरवते,तसेच आपण ईश्वर भक्त असल्याची आपण कपाळावर गंध लावत असल्याची निशाणी जाणवते.

विशेषतः हिंदुत्वाचा पुरस्कर्ता म्हणून आपली समाजात ओळख निर्माण होते.


कपाळावर गंध लावण्याचा आणखी एक फायदा म्हणजे, आज्ञाचक्रावर सतत बोटाचा दाब पडून आज्ञा चक्र जागृतीसाठी विशेष उपयुक्त ठरते.त्यामुळे साहजिकच आज्ञाचक्र जागृती द्वारा ,आत्मज्ञान, ब्रम्हज्ञान प्राप्ति साठी विशेष उपयोगी ठरते.


चला तर मग,आजपासून, आत्तापासून कपाळावर गंध लावण्याचा संकल्प करू या.आपल्या बरोबर दहा विस लोकांना गंध लावण्यासाठी प्रेरित करू या.

या मार्गाने धर्म जागृती अभियान पुढे वाढवू या.

हरी ओम्


विनोदकुमार महाजन

कार्यकारी संपादक,

सा.सावधान हिंदुस्थान

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस