हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व

 हिंदुत्व व राष्ट्रीयत्व एकच


हा देश बहुसंख्य हिंदुंचा असल्यामुळे इथल्या चाली,रिती,रूढी,परंपरा ह्या हिंदु धर्म आणी संस्कृतीशी निगडित आणी संबंधित आहेत. त्यामुळे इथले सणवार हे हिंदुत्वाशी निगडित आहेत.

आणी इथला समाज हा बहुसंख्येने हिंदु असल्यामुळे इथले राष्ट्रीयत्व देखील हिंदुत्वाशी संबंधीतच आहे.इथे अनेक पथ,पंथ,देवी, देवता,भाषा, प्रांत वेगवेगळे असले तरी सगळ्यांची सांस्कृतिक नाळ एकच आहे.त्यामुळे इथले हिंदुत्व हा एकमेव संस्कृतीशी संबंधित असणारा आणी संपूर्ण हिंदु समाज एकत्रित गुंफून ठेवणारा प्राण आहे.

इथे अनेक धर्म मनमोकळेपणाने व आनंदाने नांदतात, हे इथल्या पवित्र भुमिचे वैशिष्ट्य आहे.

त्यामुळे सहिष्णुता अथवा भाईचारा हा हिंदु धर्माचा अभिमानाचा विषय आहे.आजवरचा इतिहास तपासता काय दिसते ?

हिंदुंनी कधीही आक्रमक होऊन अथवा तलवारीचा धाक दाखवून धर्म वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. अथवा पैशाच्या थैल्या वाटून धर्म वाढवण्यासाठी इथल्या भुमीमध्ये कधिही प्रयत्न झाले नाहीत, अथवा तसा प्रयत्न ही अद्याप पर्यंत कोणी केला नाही.

अनेक आक्रमणे झाली.मुघल, इंग्रजांसारख्या अनेक आक्रमणकारकांनी इथल्या संस्कृतीवर,मंदीरावर,

सिध्दांतावर,सहनशिलतेवर हमले झाले,आक्रमणे झाली,पण ही आदर्श संस्कृति कधिही लोप पावू शकली नाही.

ज्या ज्या वेळी धर्मावर आक्रमणे झाली,धर्म संकट उभे राहिले, त्या त्या वेळी अनेक महापुषांनी,अवतारी पुरूषांनी इथे धर्माचे पुनर्जीवन केले आहे.ते ही अनेक हमले पचवत अगदी शांतीच्या मार्गाने अनेक साधुसंतांनी इथे क्रांती केली आहे.

इथली मातीच अशी आहे की,इथे नेहमी विरपुरूष,महापुरूष,अवतारी पुरूष, सिध्दपुरूष जन्माला येतात अथवा ईश्वरी इच्छेने धर्म कार्य करून, स्वत:चा मोठेपणा न मिरवता सारे श्रेय ईश्वराला समर्पित करून आपली यात्रा व कार्य थांबतात.

आज आपल्या देशात अराजकतेचे भयंकर पिक आलेले पहायला मिळते आहे.व ही अराजकता ब-याच वेळा ईश्वरी सिध्दांतावरच घाव करते आहे,अथवा कुठाराघात करते आहे,हे फार मोठे दुर्देव आहे.विशेष म्हणजे कांही स्वार्थी लोकही,सत्ता व संपत्तीच्या लालसेपोटी हिंदु बहुल देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पण आजपर्यंतचा इतिहास पाहता,स्वार्थांध अथवा लालची लोक जास्त दिवस तग धरू शकत नाहीत. कारण ही भुमिच मुळी त्यागाची असल्यामुळे उपटसुंभ्याचे चार दिवस भरले की त्यांची वाताहात होते.

या निमित्ताने चला आपण सगळेच एक होऊन हिंदुत्वाशी नाते जोडू या.अन् हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हे सिध्द करूया.


विनोदकुमार महाजन,

कार्यकारी संपादक,

सा.सावधान हिंदुस्थान

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस