जूनं ते सोनं

 *जुनं ते सोनं !!*

✍️ २४२१


खरंच ,

पुर्वीचा काळ म्हणजे सदाबहार काळ होता.

जुनं ते खरंच सोनं होत.

जुन्या माणसांचा सहवास सुध्दा स्वर्गतुल्य होता.

प्रेमळ माणसांच्या प्रेमळ आठवणी.

माणसं एकमेकावर जीवापाड प्रेम करायची.दिलेल्या शब्दाला जागायची.

दुस-यासाठी जगायची अन् झिजायची सुध्दा.


खरंच सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा सुवर्णकाळ होता तो.


जुनी माणसं पण कशी धडधाकट असायची.

दारात गावरान गाय असायची.

गाईच दूध, तूप , दही ,ताक भरपुर मिळायचं.

गाईच शेण , गोमूत्र ही बहुमोल असायचं.


आणी आता ?

गावरान गायही गेली.

अंगणही गेल.

गाईच दूध , तूप ,दही ,ताकही गेल.शेण ,गोमूत्र ही गेल.

अन् नशिबाला आलं ,फवारलेलं विषारी धान्य , विषारी भाजीपाला , विषारी फळे.

अन् घरोघरी आजारी माणसाचं  प्रमाण वाढलं .


आणी माणूसही खरंच विषारी झाला.

मनानं पण आणी विचारानपणं.

आणी शारीरिक दृष्टिने पण ?


खरंच ,माणूस कुठल्या कुठं वहात गेला.

संपत गेला.

अहंकाराचा तोरा मात्र ,भलताच वाढला.घरोघर वाढला.


मी मोठा की तू मोठा ?


खरंच , पुर्वीच्या माणसाचं मन मोठं होतं . पण आता सगळचं खोटेपणाचं पीक आलं.


शहरी फ्लैट सिस्टिमनं तर सगळं गणितच पार बिघडवलं .

आणी वर पुन्हा मोबाईलचा राक्षस ?


माणूस स्वत:च्याच दुनियेत पार हरवून गेला.

आणी समाजातही एकाकी झाला.


सणवार कमी झाले.

उत्साहाचे उधाण ही संपून गेले.

अन् माणूस ?

घाणिला जुंपलेल्या बैलासारखा राब राब राबू लागला.दिवसरात्र.


निरर्थक जीवन.


प्रेम ,दया ,मायेचे झरे आटले.

माणसाचे जीवन मर्यादित झाले.


खरंच,

काळ एवढा बदलला का हो ?


जूनं ते सोनं गेलं.

अन् नवं ते पितळ , स्टिलही गेलं .

जर्मनही मोडीत निघाल.


अन्...

नवं ते प्लास्टिक झालं ?

अख्या दुनियेचचं समदं वाट्टोळं झालं.


 *कालाय तस्मै नम: 🙏* 


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र