जळकी लोकं ?

 " *जळक्या " लोकांपासून सावध रहा !!*

✍️ २४२०


 *विनोदकुमार महाजन*

----------------------------------

सद्या समाजामध्ये एक नविन प्रकारची प्रजाती अस्तित्वात आली आहे.

जळक्या लोकांची प्रजाती !


या प्रजातीच वैशिष्ट्य एक आहे की , ते सदैव कुणा ना कुणावर ,निष्कारण जळतच असतात .

यांचा देहस्वभावच हा असतो.

कुणाचं चांगल झालेल यांना बघवणार नाही .

कुणी यशस्वी होतो आहे , चांगल यश कमावतो आहे ,नाव कमावतो आहे ,पैसा कमावतो आहे म्हंटलं की ,

यांच्या पोटात हमखास दुखायलाच लागतं . यांना कुणाच चांगल झालेलच सहन होत नाही .

आणी मग ? सतत जळत राहतात असली जळकी लोकं .

सततचा जळफळाट.


अन् मग यांच्या काड्या चालू होतात . यांचा जळफळाटाचा पोटशूळ जसजसा वाढत जातो , तसतसा यांचा द्वेष ,मत्सर उग्र रूप धारण करतो , अन् मग असले उपद्रवी लोक काड्या टाकायच काम करतात .


जाता येता एखाद्याला कुजक बोलणं ,टोचून - टाकून बोलणं , दुस-याला विनाकारण हसणं ,टिंगलटवाळी करणं, दुस-याची सतत नींदा नालस्ती करत राहणं , दुस-याविरूध्द सतत कारस्थान करत राहणं , दुस-याची बदनामी करत राहणं , हेच यांच वैशिष्ट्य असतं .

अगदी जीवनभर.

असली लोक मेल्यावरच दूस-यांना सुख लागतं.


बरं , यांना विरोध करावा तर ? तर यांना अधिकच जोर येतो.अन् मग हमरीतुमरीवर येऊन भांडण करतात. म्हणून यांच्या पासून सदैव सावध व दूर राहणचं अधिक हिताच असत .


असली हलकट माणस आपल्या मौनानं अन् त्यांच्या कडे दुर्लक्ष करण्याने मात्र चांगलीच घायाळ होतात . आणी हतबल पण होतात .

पण म्हणून काय ? यांच काड्या करणं अन् आगी लावणं कांही थांबत नाही .


अशा जळक्या लोकांमुळेच तर दुकान ,धंद्याच्या ठिकाणी लिंबू मिरची लावण्याच प्रमाण वाढतंय ना ?


असली जळकी लोकं एक तर स्वतः ही सुखी होत नाहीत. अन् दुस-यांनाही सुखी होऊ देत नाहीत .

दुस-याच जीवन बरबाद व्हावं म्हणून असली लोकं देवाला नवस सायास सुध्दा बोलतील.

पण देव कशाला ऐकतोय म्हणा असल्यांच ?

तांत्रिक - मांत्रिकाकडं सुध्दा जातील. अन् एखाद्याच चांगल आयुष्य बरबाद करण्यासाठी सतत प्रयत्न करतील.


तृतीय पंथी सुध्दा यांच्या पेक्षा हजारों पटीने चांगले. एखाद्याच भल व्हाव म्हणून ते सुध्दा आशिर्वाद देतील.

पण जळकी प्रजाती ,दुष्टपणा कधीच सोडणार नाहीत.

यांच्या पुढे विषारी साप सुध्दा बरा म्हणण्याची वेळ येते.कारण सापसुध्दा निष्कारण डसत नाही. पण जळकी लोकं मात्र नेहमी दुस-याला डसण्याच्या तयारीतच असतात.

मौके की तलाश में ?


बरं , असल्या लोकामुळं होतं काय ? तर सततचा भयंकर मानसिक त्रास होत राहतो .

आणी अशा त्रासामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

चिडचिड ,घरात विनाकारण भांडणं उद्भवतात. आणी जळक्या लोकांना यामुळे आणखीनच भांडवल मिळतं.त्यांना यामुळे अधिकच जोर येतो.आणी अधिकच आनंद होतो.त्यामुळे जळक्या लोकांची शक्ती पण वाढते.


दुस-यांचा त्रास झालेला बघण्यातच अशा जळकट अन् हलकट लोकांना आनंद वाटतो.

कायदेशीर दृष्टिनेही यांचा फणा सापासारखा ठेचता येत नाही.


मग अशातूनच सहनशीलतेची मर्यादा संपते आणी भांडणाचा भडका उडतो.आणी कधीकधी रागाच्या भरात ,एखाद्याच मानसिक संतुलन बिघडतं आणी मग भलंतचं विपरीत घडतं.


हाणामा-या , फौजदा-या ,कोर्ट कचे-या असले नको असलेले प्रसंग उद्भवतात.


हे सगळ अनिष्ट टाळण्यासाठी सदैव मौन आणी शांत राहणचं चांगल.

पण त्रास मर्यादेच्या अन् सहनशिलतेच्या पलिकडे गेल्यावर मौन आणी शांत राहणं जमत नाही. अन् कधीकधी संयमाचा बांधही सुटतो.

अन् ब-याच वेळा विपरीत अन् अकरीत घडतं.


हे सगळं टाळून , सुखी, समाधानी,आनंदी, यशस्वी बनण्याचा ,हितशत्रुवर व जळक्या लोकांवर अंतिम विजय मिळवण्याचा अंतिम मार्ग म्हणजे ?

ईश्वरी आराधना.

यामुळे आत्मबळ तर वाढतचं.

मन:शांती ही मिळते.

अन् ईश्वरी इच्छेनेच जळक्या लोकांचा पूर्ण बंदोबस्त ही होतो,अथवा संपूर्ण बिमोड ही होतो.

म्हणून मनाची शांती हवी असेल ,अपेक्षित यश हवे असेल, आणि शत्रुवर विजय पण हवा असेल तर ?

अखंड ईश्वरी आराधना आणी ईश्वरी चिंतन ,नामस्मरण हाच उपाय आहे.


प्रत्येक युगामध्ये असले दुष्ट ,जळके ,चेटके लोकं असतातच असतात.

आपण यांच्यावर विजय कसा मिळवतो अन् जीवनाची लढाई कशी यशस्वी करतो , यावरच आपले सुखदुःख अवलंबून असते.


त्यामुळे माझ ऐका ,

जळक्या ,उपद्रवी लोकांना जळतच राहू द्या.ते त्यांच्याच पापानेच अन् कर्मानेच जळून मरतील. अन् खाकही होतील, असा विश्वास ठेवा.


 *आपले जीवन आनंदी होवो.* 

बी हैपी...


हरी ओम्


👍🌹🌹🌹🌹🌹

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस