लक्ष्मी व अवदसा...

 *लक्ष्मी आणि अवदसा.* 

 *एक बोधकथा...*


✍️ २९४४


 *विनोदकुमार* *महाजन...* 


🌹🌹🌹🌹

जिथे लक्ष्मी राहते तिथे सुख शांती समाधान नांदते तर जिथे अवदसा राहते तिथे अशांती दारीद्र्य भांडणे कटकटी राहतात.म्हणूनच लक्ष्मी आणि अवदसा ( दोघी बहिणी ) एकत्र राहू शकत नाहीत.


एकीकडे शांती समाधान आहे तर दुसरीकडे अशांती दारीद्र्य भांडणे कटकटी आहेत.


एक संपन्न घर होते.व तिथे सदैव लक्ष्मीचा वास होता.

सात भावंडे त्यांच्या पत्नी व मुलेबाळे मोठ्या आनंदाने एकत्र रहात होते.

चुकुनही कुरबुर किंवा भांडण तंटा त्या घरात नव्हता.


एक दिवस अलक्ष्मी ( अवदसा ) आपल्या बहिणीला लक्ष्मीला म्हणाली , " फक्त एक दिवस तु घरातून बाहेर जा मला घरात राहू दे. मग बघ घर कसे बरबाद करते ते ? "


त्यावर लक्ष्मी हसून म्हणाली , " तु तिथे राहणे शक्य नाही.एक दिवसातच तू तिथून पळून जाशील."


झाले... एक दिवस लक्ष्मी बाहेर गेली व घरात अवदसा घुसली...तिने घराची शांती बिघडवण्यासाठी , घरात कलह लावायला सुरुवात केली.


स्वयंपाक करताना चुकून सात जावापैकी एकीकडून भाजीत मीठ प्रमाणापेक्षा जास्त पडले. खारटघोट झाली भाजी.( अवदसेची कमाल ) अवदसेला वाटले , " आता या घरात मिठावरून खडाजंगी भांडणे होणार व लक्ष्मी त्यामुळे नाराज होऊन कायमची घर सोडून निघून जाणार. आता आपले कायमचे राज्य येणार. "


झाले...पंक्ती वाढल्या... आणि कमालच झाली.अवदसा आश्चर्यचकित झाली.


जेवताना कुणी कांहीही एक शब्द ही वाईट न बोलता मिठाबद्ल एक शब्दही न बोलता हसत खेळत आनंदाने सर्व जणांची जेवणे झाली.

कुणाचा त्रागा नाही , कुणाचा चिडून वैतागून एक ब्र शब्द नाही.

जसे कांहीं घडलेच नाही ,  मिठ जास्त पडल्याचा कुणी चुकूनही उल्लेख केला नाही.अशी स्थिती.

एकंदर काय तर ?

घरातील प्रत्येक जण समजूतदार असल्यामुळे घरात कलह पेटणे तर दूरच...

घराची तसुभर देखील शांती भंगली नाही.


लक्ष्मी हसून अवदसेला म्हणाली..." मी सांगितले होते ना तुला या घरात तु एक सेकंद ही राहू शकत नाही.हे माझ्या वास्तव्याचे कायमचे स्थान आहे. "


त्या दिवसापासून त्या घरात अवदसा चुकुनही घुसली नाही व संपूर्ण परिवार मोठ्या आनंदाने एकमेकावर खरे ईश्वरीय दिव्य प्रेम करत राहिला.

म्हणूनच लक्ष्मी माता तिथे स्थिर होती...


तात्पर्य :  - छोट्या छोट्या गोष्टीवरून मनाची शांती ढळू देऊ नका.किरकोळ गोष्टी वरून चिडचिड राग वैताग शेवटी आपलेच आयुष्य उद्ध्वस्त करतो.

मनाचा मोठेपणा , शांती सदैव आनंदी वृत्ती नेहमीच आपल्याला माता महालक्ष्मीची व सर्व देवी देवतांची कृपा मिळवून देतो.

अशक्य ही शक्य करण्याची अद्भुत शक्ती यामध्ये आहे.

हा माझा स्वानुभव आहे.


लेख आवडला तर नक्कीच माझ्या व्हाट्सअप वर प्रतिक्रिया द्या.

विनोदकुमार महाजन 

पत्रकार 

+91 8329894106

भारत देश...

 *जय श्रीकृष्ण...*

🙏🕉️🚩🌹

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

गौमाता बचाओ