दु:खाचा साथी
*संकटात एकमेकांना* *आधार द्या....*
✍️ २८००
*विनोदकुमार महाजन*
@@@@+++
प्रत्येक मनुष्याला त्याच्या आयुष्यात कांहीं ना कांहीं संकटे , दुःख असतेच असते.
अशावेळी त्या व्यक्तीला खंबीर मानसिक आधार देणारे , संकटात कोणी तरी खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे , संकटात धावून येणारे कोणीतरी जीवाभावाचे असावे असे वाटते.
आणी ते स्वाभाविक पण आहे.
सुखदुःखात एकमेकांना समजावून घेणारे , आपले दुःख हलके करणारे कोणीतरी असावे असे प्रत्येकाला वाटत असते.
दु:ख , संकटे एकट्याने भोगण्यापेक्षा त्यात कोणीतरी भागीदार असावा असे वाटणे साहजिकच आहे.त्यामुळे दु:खाची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते.
पण अशा बिकट प्रसंगी जीवाभावाचा खरा मैतर , सखा , जीवलग दोस्त मिळणे खरेच कठीण असते का .?
सुकाळ सोबती दुनिया म्हणतात ते उगीचच का ?
ज्याच्यापाशी आपण आपले सगळे दुःख हलके करू आणी प्रसंगी त्याच्या खांद्यावर डोके ठेवून अगदी मनमोकळे अन् ढसाढसा रडू सुध्दा , असे एखादे तरी नाते असावे असे आपणास नेहमीच वाटत असते.
आई आणी वडील सोडले तर या जगात खरे जीवाभावाचे खरेच कोणी सापडू शकेल का हो ?
आणी ज्याला लहानपणापासून आई वडीलांचे छत्रच नाही , ज्यांना आई वडीलांचे प्रेमच माहिती नाही, त्यांनी अशा बिकट परिस्थितीत काय करावे ?
दु:खात एकटे रडत बसावे की ईश्वर चरणी आपले सुखदुःख अर्पण करावे ?
हल्ली समाज मानस असे झाले आहे की ? काय झालंय तर जागोजागीच्या असंस्कृत पणामुळे आणी सामाजिक विकृती मुळे , असे दु:ख हलके करण्यासाठीचे जणू एखादे तरी नातेच शिल्लक राहिलेले नाही की काय असे वाटू लागले आहे.?
कारणे कांहीही असोत.
पण माणसांची मने ठिसूळ , बोथट झाली आहेत की मनुष्य प्राणी संवेदनाशून्य झाला आहे की काय कांहीच कळेनासे झाले आहे.?
एकमेकांना एकमेकांविषयीची सहानुभूती , आत्मियता , प्रेम , जीव्हाळाच समाजातून गायब झाला आहे की काय असे वाटू लागले आहे.
त्यामुळे सुखदुःखात एकमेकांना खंबीर साथ देणे , आधार देणे जणू दुरापास्तच झाल्यासारखे वाटत आहे.
बरं ...
एखाद्यावर खरे प्रेम करून त्याच्या संकटात उडी घ्यावी तर तो समोरचा व्यक्ती कधी धोका देईल , घात करेल याचाही भरवसा राहिलेला नाही.
दुस-याला दु:खमुक्त करायला गेले तर तो सुटतोय आणी ? आपणालाच अडकवतोय असेही भयंकर विचित्र चित्र आज आपल्याला बरेच ठिकाणी समाजात पहायला मिळते आहे.
मग माणसे एकमेकांच्या सुखदुःखात धावून तरी कशी जाणार ?
एखाद्याची आर्थिक स्थिती बिकट आहे म्हणून त्याला आधार द्यायला गेले तर तो संबंधित व्यक्ती ज्याला आधार दिला तोच आपलेच नरडे धरतोय , त्याच्याविरुद्ध च भयंकर षडयंत्र करतोय ?अशीही भयंकर दृश्य समाजात आज पहायला मिळत आहेत.?
दिवसेंदिवस खरेच परिस्थिती मोठी विचित्र आणी कठीण होत चालली आहे.?
तरीही एखाद्या सुह्रद व्यक्तीला दुसऱ्याचे दुःख बघवत नाही , म्हणून असा सुह्रदयी व्यक्ती इतरांच्या दुःखात आधार देतोच.
पण वारंवार असे आधार देणे ही अंगलट येत असेल तर , संबंधित व्यक्ती कठोर अथवा पाषाणह्रदयी होणे स्वाभाविक आहे.
म्हणूनच आधार द्यायचाच असेल तर नेहमी सज्जनाला द्यावा कारण त्याला त्याची कदाचित जाणीव राहते.
दुर्जनाला आधार कधिही देऊ नये. कारण दुर्जन सापासारखा कधी डसेल याचा भरवसा नसतो.
एखाद्या हळव्या मनाच्या व्यक्तीला दुसऱ्याचे दुःख , अश्रू बघवत नसतात.
दुसरा दु:खात, संकटात सापडला आहे म्हणून त्याच्या मनाची घालमेल सुरू होते.
पण अशा हळव्या मनाच्या व्यक्तीच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारेही लबाड लांडगे समाजात भरपूर असतात.
मला स्वतःला आजही कुणी दुःखात दिसले की अनायासेच माझ्या डोळ्यात पाणी येते.
पण हा आपल्या मनाचा कमकुवतपणा आहे व याचा अनेक जण गैरफायदा घेणारेही भरपूर प्रमाणात आहेत हे जेंव्हा माझ्या लक्षात आले तेंव्हा ख-या गरजवंताला अथवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला ही आधार देण्याची इच्छा रहात नाही.
त्यामुळेच की काय रस्ता अपघातात एखादा सापडला तर जवळजवळ सगळेच बघ्याची भुमिका घेतात ??
एखाद्या सुह्रदयी व्यक्तीला मुर्ख समजून फसवणारे भामटेही समाजात भरपूर आहेत.
आपला जीव संकटात घालून दुस-याला आधार देणारे पुण्यात्मे आजही समाजात आहेत.पण त्याचे मोल त्याच समाजाला मुळीच नसते हे ही वास्तव आहे.
सावरकरांनी घरादाराची राखरांगोळी करून , स्वतः चे आयुष्य आपल्या बांधवांसाठी, हिंदू समाजासाठी, हिंदुत्वासाठी आपले उभे आयुष्य वेचले.पण किती हिंदुंना सावरकरांची खरी कींमत कळाली ?
सावरकर आजही ब-याच हिंदुसाठी उपेक्षेचाच विषय आहेत ना ?
खरे सावरकर किती हिंदुंना कळाले ? तसेच समाजातील खरी माणसेही किती लोकांना ओळखू येतात आणी किती व्यक्ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात हाही मोठा यक्ष प्रश्नच आहे ना ?
कृतघ्न हिंदू ??
दूसरे काय ?
उलटपक्षी ज्यांनी हिंदू संस्कृती संपवण्यासाठी सत्तेचा दुरूपयोग करून,भयंकर कुटील डाव टाकले , अशांच्या पाठीशी मात्र हिंदू समाज खंबीरपणे उभा राहिला.?
अगदी आज सुद्धा ?
आश्चर्य आहे ना ?
कसली ही भयावह आणी विनाशकारी विकृती आहे ही ?
साप साप म्हणून भुई धोपटायची आणी स्वतः ची पण अपरीमीत हानी करून घ्यायची जणू सवयच जडली आहे माझ्या अनेक समाज बांधवांना ? अनेक शतकांपासून ??
स्वतः संकटात असुन दुस-यांना आधार देणे , इतरांच्या संकटात धावून जाणे , ज्याच्यावर प्रेम करतो त्याला दुःख मुक्त करण्यासाठी स्वतः चे सर्वस्व झोकून देणे हा फार मोठा दैवी गुण आहे.पण असा दैवी गुण असणारा व्यक्ती फार दुर्मिळ आहे अथवा सापडणे अशक्य आहे असे वाटते.
जर एखाद्याच्या कुटुंबातील एखादा सदस्य सगळ्यांच्या आयुष्याशी खेळत असेल , इतरांचे जगणे मुश्कील करत असेल तर त्याचा नक्कीच विरोध झालाच पाहिजे.
पण अशा व्यक्तिच्या पाठीशी सगळा समाजच उभा रहात असेल आणी जो सगळ्यांच्या कल्याणासाठी त्या संबंधित व्यक्तिचा विरोध करत असेल तर त्या संबंधित व्यक्तीलाच भयावह नरकयातना देऊन त्याला त्याच्या आयुष्यातून उठवणे अथवा तसे प्रयत्न करणे ही कुठली संस्कृती आहे.?
आणी अशी विकृती समाजात जागोजागी फोफावत असेल तर तो समाज कोणत्या दिशेने जात असेल ? हे ही बघणे गरजेचे आहे.
म्हणूनच कल्याणकारी सावरकर या देशाला नको आहेत ? तर विनाशकारी ? मुखवटा धारी या देशाला हवे आहेत का ??
एखाद्या स्त्रिचा नवरा त्या असहाय स्र्तिचा भयावह मानसिक छळ करतो , सहन न होण्यासारख्या घाणेरड्या शिव्या रात्रंदिवस व विनाकारण देतो , सतत आई माई चा उध्दार करतो ? आणी तरीही समाज अशा व्यक्तिचा विरोध करायचा सोडून त्या संबंधित नव-यालाच देव मानून पूजा करण्यास सांगत असेल तर ही कसली समाज रचना आहे ?
ही तर विनाशकारी विकृत समाज रचना आहे.
आणी तिचा कडाडून विरोध हा झालाच पाहिजे.
पण विरोध करणारालाच गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे केले जात असेल तर ? समाजाची ही कसली मानसिकता आहे ??
अनेक समाज सुधारकांनी वारंवार असल्या गोष्टींवर मंथन केले आहे.पण तत्कालीन परिस्थिती मध्ये अशा समाज सुधारकांनाही भयंकर नरकयातना भोगाव्या लागल्या आहेत.
कारण ?
विकृत समाज रचना ??
आणी विकृत सामाजिक मानसिकता ?
मग अशा समाज रचनेत सत्याला न्याय कसा मिळणार ? आणी कधी मिळणार ?
कारणे कांहीही असोत.
माझा सर्व सनातनी समाज एकसंध होऊन उच्च कोटीची सनातन संस्कृतीची वैश्विक शक्ती निर्माण करण्यासाठी आपण सगळ्या शापीत व असह्य पिडादायक गोष्टी सोडून , एकमेकांना संकटात खंबीर आधार देणे हीच खरी सामाजिक उत्कर्षासाठीची नांदी ठरेल.
बघा विचार करून.
पटतंय का बघा.
*जय हरी विठ्ठल*
🌹🌹🌹🌹🌹
Comments
Post a Comment