जोडिदार
*एक खरा जोडीदार* *हवाच...!!!*
✍️ २८१३
🌹🩷🌹🩷
प्रत्येकाला नेहमी अगदी मनापासून वाटत असतं...की...
आपल्याला एक खरा जोडीदार हवा...
सुखदु:ख वाटून घेणारा, संकटात खंबीर आधार देणारा , सगळी सुखदुःख सांगायला प्रत्येकाला अगदी एक हक्काची जागा हवी असते.
होय.
प्रत्येकाला अगदी असंच वाटत असतं.
नेहमी वाटत असतं.
मग तो मित्र असो , नातेवाईक असो...
पण स्वार्थी, बेगडी , वरपांगी जगात ,
भपकेबाजपणा आणी दिखाऊपणात अडकलेल्या दुनियेत असं एक तरी नातं शोधण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो.
आणी ब-याच वेळा असं नातंच भेटत नाही , आणी आपलं मन अगदी नाराज होऊन जातं.
दादा कोंडके सारखा शाहीर सुध्दा आपल्या एका गाण्यात आपलं दुःख हलके करतो आणी एक कुत्र्याला उद्देशून मराठी गाणे म्हणतो...
" माझं माझं म्हणीत होतो , त्यांनीच मजला सोडलं , जन्मोजन्मीच नातं माझं गड्या तुझ्याशी जोडलं ! "
काय भावपूर्ण शब्द रचना आहे ना मित्रांनो ?
म्हणजे दादा कोंडके सारख्या महान कलाकाराला सुद्धा हे दुःख होतं तर ?
दादा कोंडके एवढ्यावरच थांबत नाहीत तर ते पुढे म्हणतात ,
" चल रं वाघ्या रडू नको , पाया कुणाच्या पडू नको , आन् दुनिया सारी जरी उलटली न् मला कधी रं सोडू नको...
आरं वाघ्या... माझ्या वाघ्या...! "
खरंच दुनिया एवढी क्रूर आहे का हो ?
दादा कोंडके यांना सुद्धा सुखदुःख सांगायला एक हक्काचे नाते मिळाले नाही ?
म्हणूनच ते कुत्र्या बरोबर बोलतात आणी कुत्र्यासंग रडतात बी...?
आश्चर्य आहे ना ?
अगदी सगळ्यांच्या जीवनात असंच असतं का हो ?
मनाची घुसमट , घालमेल आतल्या आत पचवत रहायचं ?
याचंच नाव जीवन आहे का हो ?
अगदी खरं सांगा बघू...
खांद्यावर डोके ठेवून , दुःख हलके करायला अन् ढसाढसा , मनसोक्त रडायला सुध्दा एक जागा शिल्लक नसावी या जगात ?
लोकसंख्या तूफान वाढली पण माणुसकी , आत्मीयता , प्रेम , श्रध्दा , विश्वास पार संपल का हो या कलियुगात ?
जिकडे तिकडे स्वार्थाचा बाजार ?
पण मी हे लिहितोय ते खरं की खोटं देवच जाणे.
पण वाटतं मला आपलं माझ्या मनाला.म्हणून लिहीतो.
बिनधास्त पणे...
पण एक मात्र नक्की खरे आहे की ,
सगळ्यांना हो...
अगदी सगळ्यांना असं नक्कीच वाटत असतं की...
एक तरी खरा जीवलग मित्र असावा...
जिवाभावाचा...
जिवापाड प्रेम करणारा..
आत्मीयतेने विचारपूस करणारा...
प्रत्येक सुखदुःखात स्वतः ला अगदी मनमोकळे पणे झोकून देणारा...
कसलाही आडपडदा न ठेवता खरं खुरं
अगदी ईश्वरी प्रेम करणारा...?
*तुम्हाला काय वाटतं..*??
*जय सिताराम*
🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment