समजुतदारपणा

 *समजुतदारपणा...*

✍️ २७९९


 _विनोदकुमार महाजन_


👍🌹👍🌹👍 


समजुतदारपणा...

जीवनातील यशाचे एक अजब शस्त्र.


साधारणतः तरूण वयामध्ये तापटपणा व आक्रस्ताळेपणा जास्त प्रमाणात असतो.

प्रत्येकाने आपले ऐकलेच पाहिजे अशी मनाची धारणा असते.

पण जसजसे वय वाढत जाते तसतसे मनुष्य जागोजागी तडजोडी करत जातो आणी या तडजोडीतुनच समजुतदारपणाचा जन्म होतो.


सहनशीलता , सोशीकता म्हणजेच समजुतदारपणा.


पण अती समजुतदारपणा पण जीवनात ब-याच वेळा मारक ठरतो आणी प्रसंगावधान राखुन दाखवलेला समजुतदारपणा नेहमीच तारक ठरतो.


समजुतदारपणा मुळे जीवनातील अनेक प्रश्न मार्गी लागतात तर ब-याच वेळा सहनशीलतेच्या अतीरेकामुळे अनेक गंभीर प्रश्न देखील निर्माण होऊ शकतात.


म्हणजेच जीवनात नेहमीच समजुतदारपणाचा गुरूत्वमध्य काढून मार्गक्रमण करणे हीतकारक ठरते.


समजा 

आपण एखाद्यावर खूप प्रेम करतो पण त्याला , आपण ज्याच्यावर निरपेक्ष खरे निस्वार्थी प्रेम करतो याची त्याला त्याची शून्य कींमत वाटते...

अशावेळी आपण त्याच्याशी इर्षा न करता अथवा समजावुन न सांगता अथवा हुज्जत न घालता मौनपणे , समजुतदारपणाने मनाचा मोठेपणा दाखवून तडजोड करतो व समजुतदारपणाने त्याच्या वाटेतून आणी त्याच्या आयुष्यातून सुध्दा कायमचे दूर निघून जातो...हाच खरा समजुतदारपणा.

आणी हेच खरे जीवन.


ब-याच वेळा दुष्ट व्यक्ती आपणास नेहमीच भयंकर मानसिक त्रास देतात अथवा मानसिक छळ करतात अशावेळी पण साधारणतः संघर्ष न करता तिथून कायमचे निघून जाणेच जास्त श्रेयस्कर समजतो.

आणी हा समजुतदारपणा आयुष्यात नेहमीच हितकारक ठरतो.


दररोजची कटकट आणी भांडणतंटा नको , ही त्यामागची भूमिका असते.


पण ब-याच वेळा संघर्ष केल्याशिवाय अन्य पर्याय ही आपल्या समोर उपलब्ध नसतो.

मग त्यातून निर्माण होतो टोकाचा संघर्ष आणी आयुष्य भरासाठीची बेचैनी आणी अस्वस्थता.


कांहीं दुष्ट षड्यंत्रकारी माणसे आपले सद्गुण , चांगुलपणा न बघताच आपल्याला सतत छळत असतात.

आपण कितीही समजुतदारपणा धरला तरी त्याची किंमत अनेक वेळा शून्य ठरते.


उलटपक्षी ब-याचवेळा आपल्याकडे कितीही सद्गुण असले तरी ते पायदळी तुडवले जातात आणी आपल्याला भयावह परिस्थिती मध्ये जीवन जगावे लागते, अशावेळी कितीही उच्च कोटीचा समजुतदारपणा धरूनही काय उपयोग ?

मग अशावेळी अनायासे टोकाचा संघर्ष सुरू राहतो.व तो अगदी आयुष्यभर धूमसत राहतो.


ब-याच वेळा ईश्वरी दरबारात आपली किंम्मत अनमोल असते पण दुष्टापुढे आपला भयंकर छळवादच ठरलेला असतो.


अथवा उदाहरणच द्यायचे झाले तर ,

मी हिंदुत्वावर , आध्यात्मावर , सामाजिक अथवा अन्य विषयांवर अनेक लेख लिहीतो पण ? त्याच्याशी कुणालाच कांहीही घेणंदेणं तर नसतंच , उलट मी वारंवार अडचणीत कसा सापडेन अथवा अडचणीत सापडून कधी संपेन याची माझीच माणसे जर आतुरतेने वाट पाहत असतील तर ? अशावेळी ?

सर्वांचे कायमचे संबंध तोडून टाकून समजुतदारपणे कायमचे दूर निघून जाणे व आपला वैयक्तिक उच्च कोटीचा उत्कर्ष करत राहणे , हेच हितकारक ठरते.


मग आपणाला कोणी कितीही अल्पबुध्दी ठरवो , स्वार्थी मतलबी ठरवो कायमचे दूर निघून जाणेच हितकारक असते.


सुखदुःख जाणून घेण्यासाठी व दुःखात फूंकर घालण्यासाठी नातिगोती असतात.पण तिच नातिगोती आपला सदासाठी कर्दनकाळ ठरत असतील तर तिथून समजूतदारपणे कायमचे दूर निघून जाणेच सुखी जीवनासाठी योग्य ठरते.


कारण अशा व्यक्तींशी निष्कारण हुज्जत घालून आपला वेळ व आयुष्य , शक्ती व्यर्थ वाया घालवण्यापेक्षा समजुतदारपणे कायमचे दूर निघून जाणे व उच्च कोटीचा उत्कर्ष करणेच हितावह ठरते.


ज्यांना ? माझे समजून त्यांच्या हितासाठी आपण रात्रंदिवस धडपडतो ते ? माझे हिंदू ? मला तन मन धनाने संपूर्ण सहकार्य करायचे सोडून माझ्याच वाईटावर रात्रंदिवस टपलेले असतील तर ?

समजुतदारपणा तरी कसा आणी किती दिवस धरायचा ? हाही मोठा यक्ष प्रश्न आहे.


पण साधारणतः आपण पाहीले तर अनेक महापुरुषांनी त्यांच्या आयुष्यात अनेक तडजोडी करून , समजुतदारपणा धरून, अडचणी वर मात करत करत पुढे गेले आहेत आणी आपले उच्च ध्येय गाठलेले आहे अथवा दिव्यत्व प्राप्त केलेले आहे.


विशेषतः आपल्या हिंदू धर्मामध्ये सत्पुरूषांना , महापुरूषांना छळण्याचे , त्यांचे जगणे असह्य करण्याचे अनेक भयंकर प्रकार वारंवार घडत आलेले आहेत.

आणी अनेक वेळा महापुरुष भयंकर अडिअडचणीतुन मार्ग काढत आपल्या अंतीम ध्येयापर्यंत पोहचले आहेत.


एखाद्याची खरी बाजू न ऐकून घेता अथवा संपूर्ण सत्य समजावून न घेताच एखाद्याच्या मनावर सतत कुठाराघात करत राहणे आणी सत्यवादी , ईश्वर वादी व्यक्तिचे जगणेच अगदी मुश्किल करणे असले अनेक प्रकार ही आपल्या समाजात वारंवार घडत असतात.


अशावेळी स्वार्थांध समाजाची राक्षसी विकृती जेंव्हा जोर पकडते त्यावेळी भयंकर सामाजिक अंध:पतन तर होतेच होते , जे आज चालू आहे,पण तो समाज ही विनाशकारी खोल गर्तेत ओढला जातो.


आजही आपला बराच हिंदू समाज स्वार्धांधतेने ख-या लोकांना बळ द्यायचे सोडून देशद्रोही व विघटनकारी शक्तींना बळ देतो आहे आणी स्वतः च्या ईश्वर निर्मित आदर्श सनातन संस्कृती वर कुठाराघात करतो आहे , हे खरोखरीच दुर्दैव च नव्हे तर अती भयावह आहे.

आणी आज तरी याला समर्पक उत्तर सापडत नाही.

कारणे कांहीही असोत.

पण खरा व्यक्ती आजही जागोजागी प्रचंड अडचणीत व संकटात सापडलेला आहे हे मात्र नक्की खरे आहे.आणी अशा व्यक्तिंना कुठेही आधार दिला जात नाही , हे ही मोठे दुर्दैव आहे.


आणी संकटात सापडलेला समाज एकसंध न होता विखुरलेला आहे , हे ही मोठे दुर्दैव आहे.


आज कित्येक हिंदुत्ववादी व्यक्तिंना आर्थिक सहयोग नको आहे , अथवा धन वैभव नको आहे , त्यांना हवा आहे पुढे जाण्यासाठीचा मानसिक आधार आणी खरी मायेची ऊब व मायेचा आधार.


पण आपलेच कांही विकृत लोक , व्यक्ती अशा देशासाठी , समाजासाठी सर्वस्व समर्पित असणाऱ्या व्यक्तीवरच कुठाराघात करून त्यांचे जगणे आजही मुश्कील करत आहेत.


दुर्दैव हिंदू समाजाचे.


 *श्रीकृष्णार्पणमस्तु* 


🫣🫣🫣🫣🫣

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

सोनारीचा काळभैरवनाथ