देव बाजारचा भाजीपाला नाही रं

 *मनी नाही भाव ???* 

✍️ २८०८


एखाद्या जागेतून *देव* *निघून गेला की तो* कायमचाच निघून जातो व तेथील स्थान महात्म्य कायमसाठी संपून जाते.

कारण ? जागोजागी ह्रदयातली *माया* आटली आणी फक्त धनाची *माया* शिल्लक राहिली.

( देवासारखी माणंसही अशीच असतात ? )


पण पशुपक्षात ही ह्रदयातली *माया* अजूनही शिल्लक राहिली.


म्हणूनच साधू संत , देव गिरी कंदरी राहतो , पशुपक्षाशीं बोलतो...आणी मनुष्य वस्ती पासून दूर निघून जातो.


हिमालयात निर्जन ठिकाणी म्हणूनच महासिध्दयोगी निरंतर वास्तव्य करतात.

तिथेच खरे देवाचे ही सानिध्य असते.


 *गिरनारी राहतो माझा* भगवंत....

मनुष्य वस्ती पासून दूर...

 *अगदी एकटा....* 


म्हणूनच *खरे भक्त*? सोडून ? देव माणसाकडे कधी जात नाही तर त्याला शोधायला माणसेच गिरनारी जातात.


 *पण ? तीथे* ही तो किती जणांना भेटतो ?


 *देव दिसत नाही पण* *जाणवतो मात्र* *नक्की.* 


 *देव भावाचा भुकेला...** 

म्हणूनच *सखा श्रीकृष्ण* *फक्त राधेकडे*

राहतो... 


 *म्हणूनच प्रेम* 

भगवंतावर करावं

माणसांवर नाही...

कारण ?

मनुष्याकडे ? *धोका* आहे ...भगवंताकडे ?

 *आईचं वात्सल्य* 

आहे....

( *आत्मानुभूती* )


*मन चंगा तो कठौती में* *गंगा ??* 


 *मनी नाही भाव म्हणे* *देवा मला* *पाव ??* 


 *देव बाजारचा भाजी* *पाला नाही रं...* 


 *देव* अशान पावायचा *नाही रं...* 


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

सोनारीचा काळभैरवनाथ