कडू गोळी

 *कडू गोळी आणी कडू* *बोलणे ?* *हितकारक असते...??*

✍️ २८१२


 *विनोदकुमार महाजन* 

🤫🤫🤫🤫


कडू गोळी 

कडू औषध नेहमीच हितकारक ठरते.

भल्या भल्या आजारावर कडू औषधे रामबाण उपाय ठरतात आणी आजारही बरे करतात.


आणी कडू बोलणे ?

जर उद्देश साफ असेल , मन स्वच्छ असेल , अखंड कल्याणाची भावना असेल तर ?

कडू बोलणेही हितकारक ठरते.


आणी गोड बोलणारे ?

केसाने गळा कापतात , असे म्हणतात.


अलिकडे कडू बोलणे ही जणू एक फॅशनच झाली आहे.कुणीही उठतो आणी उणे दुणे काढून , द्वेषाने , कपटाने बोलतो , अशी बरीच उदाहरणे आज समाजात पहायला मिळतात.


मग कडू बोलणे हितकारक कसे ?

आई आपल्या लेकराला कधी कधी बदड बदड बदडते.पण तिच्या या बदडण्यात द्वेष नसतो तर माया असते.मायेची ऊब असते.ब-याच वेळा आई लेकराला कडू बोलते.आपल्या लेकराचे कल्याण व्हावे अशी तिची त्यामागची भावना असते.

सत्पुरूष सुध्दा असेच असतात.

कडू बोलतात ते समाज हितासाठी.

पण स्वच्छ मनाच्या सत्पुरूषांना कोणी खलनायक ठरवून त्रास देत असेल तर तो काळाचा महिमा होय.

वास्तविक अनेक संत महात्मे सुद्धा समाज सुधारणे साठी अनेक वेळा कठोर भूमिका घेतात.


दुष्टांना सुधारण्यासाठी जसे कठोर कायदे असतात तसेच कठोर शब्द सुध्दा ब-याच जणांच्या आयुष्यात नवसंजीवनी देतात.


पण अलिकडे झालंय काय तर समाज मनच आज बिथरलयं की काय असे वाटू लागले आहे.

जो तो उठतो तो एकमेकांना कठोर बोलतो , शिवीगाळ करतो.

हे नवसंजीवनी देणारे औषध नव्हे तर दुष्टांच्या ह्रदयातून निर्माण होणारे जालिम जहर आहे.


म्हणूनच कठोर शब्द , कठोर बोलणे ही दुधारी तलवार ठरते.


पण आज अशी परिस्थिती आहे की , कुणी कुणाचे बोलणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत च नाही.

चांगल्या उद्देशाने कोणी कठोर बोलत असेल तर तो ही आज समाजात खलनायक च ठरवला जातो आहे.


समाजातली बेफिकीरी , उद्दामपणा एवढा भयंकर वाढला आहे की , प्रत्येक जण स्वतःला जणू देवाचा अवतारच मानू लागला आहे.


कुणी कुणाला कांहीं बोलले , एक चकार शब्द जरी काढला तर ? भलंमोठं आकांडतांडव माजवलं जातं आहे.


कुणाचा पायपोस कुणाला नाही.कुणाचा ताळमेळ कुणाला नाही ,अशी सामाजिक अवस्था आहे.


एकंदर काय तर ?

कडू औषध हितकारक जरी ठरत असले तरी , एखादा वहात जात असताना , त्याला सावरण्यासाठी कुणी एखादा कडू शब्द जरी वापरला तरी अंगलट येतंय.


कुठं चाललाय हा समाज आणी सैरभैर दिशाहीन समाज मन ?


असो...

 *कालाय तस्मै नमः* 


🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

सोनारीचा काळभैरवनाथ