चला गीरनारला

 *चला गीरनारला दत्त* *दर्शनाला...!!!*

✍️ २७९५


 *विनोदकुमार महाजन* 


🙏🙏🙏


दत्त दत्त ऐसे लागले ध्यान , हारपले मन झाले उन्मन , मी तु पणाची झाली बोळवण ,

एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ...


गेलो दत्त मई होऊनी...


दत्त महिमा शब्दात काय वर्णावा ?

खरंच ,

दत्त महिमा अगाध आहे.


दत्त म्हणजे साक्षात सद्गुरू.दत्त म्हणजे साक्षात स्वर्ग.दत्त म्हणजे साक्षात ब्रह्म.दत्त म्हणजे साक्षात ब्रम्हांड.

दत्त म्हणजे माझे सद्गुरू आण्णा.आण्णा म्हणजे साक्षात दत्त.

दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश.दत्त म्हणजे महालक्ष्मी महासरस्वती महाकाली.

दत्त म्हणजे साक्षात देहतीस कोटी देवता.


दत्त कुठे शोधायचा ?

तो तर चराचरात भरून उरला आहे.कणाकणात व्यापला आहे.रोमारोमात बसला आहे.


साकारातही तो आहे.निराकारातही तो आहे.पशुपक्षातही तो आहे.

सर्व व्यापी सर्व साक्षी भगवंत.तोच माझा दत्त.

माझ्या ह्रदयातही तोच वसतो आहे निरंतर.

स्थूल सूक्ष्म तोच तो.

सगुण निर्गुण तोच तो.


त्याला वेगळा कुठे शोधायचा ?


गाणगापूरी तोच आहे.

अक्कलकोटी तोच.

शेगांवी तोच.

कुरवपूरात तोच.

औदुंबरी वसतो तोच.

नृसिंह वाडीतही तोच.


आणि गीरनारी ही तोच तो .

दत्त प्रभू माझा.


तरीही आयुष्यात एकदा तरी गीरनार ची वारी जरूर करावीच करावी.

स्थान महात्म्य.

गुरू गोरक्षनाथ व गुरु दत्तात्रेय यांचे स्वर्गीय उच्च स्थान.


जगातील, ब्रम्हांडातील सर्वोच्च स्थान.


हाती झोळी , एक लंगोटी तरी ? ब्रम्हांडाचा नायक.

उच्च कोटीचे वैराग्य.

तरीही राज ऐश्वर्या ची देणं.

श्वान आणि गौमातेचे निरंतर वास्तव्य असणारे 

परम दैवत...

दत्त गुरू माऊली...

दीनांची साऊली...


माहुर गडावर ही राहतो.

कोल्हापूर येथे भिक्षा.

रात्रीचा मुक्काम गीरनार.

एका पावलात सर्व पादाक्रांत.


खरंच 

दत्त महिमा काय वर्णावा ?


निरंतर चैतन्याचा वाहणारा झरा म्हणजे दत्त गुरू.

साक्षात अमृत म्हणजे दत्त.


गीरनारी तो भेटतोच भेटतो.

आपली आतुरतेने वाट पाहतो.

देव भावाचा भूकेला.


एक वारी दोन वा-या तीन वा-या.

प्रत्येक वारी अन् प्रत्येक पायरी जणू आपले कर्म जाळत असते.

दहा हजार पाय-या ?

वर दत्त स्थान ?

अलभ्य दर्शनाने तन मन शुद्ध होते.

आत्मा परमात्मा एकरूप होतो.


त्या गुरू दत्तात्रेय याच्या आदेशाने मी ही गेलो गीरनारी.

ध्यानीमनी नसताना.

सगळं काही अशक्य वाटत असताना.


अलखनाथ बापूंनी एक टीम बनवली.अन् प्रवास सुरू झाला.

गीरनारचा.


प्रकृती ठीक नव्हती.

गीरनारी जाणं अशक्य वाटत होतं.


पत्नी शैलाला सांगीतलं ,

गीरनारी चाललोय.

दत्त प्रभुंची इच्छा असेल तर परत येईन.

अन्यथा ? 

मोक्ष....?


तरीही गेलो.

दत्त प्रभुंचे दर्शन झाले.

नर देहाचे सार्थक झाले.

कसा गेलो कसा परत आलो ? कांहीच कळाले नाही.

हा एक फार मोठा चमत्कार झाला.


दत्त प्रभूंना सांगीतले,

तूच पुढचे नियोजन कर.

आणि ? दत्ताने रस्ता दाखवला.

तीर्थ यात्रा परीपूर्ण झाली.


पुढे अलखनाथ बापूंच्या मार्गदर्शनाखाली दातार , तेथील वाघ सिंहाचा थरारक अनुभव , आमच्या रूमच्या आसपास दोन तीन सिंह , एक बिबट्या अन ? त्यांचे गुरगुरने.

टाॅयलेट बाथरूम बाहेर.


पुढे अलखनाथ बापूंच्या मार्गदर्शनाखाली सोरटी सोमनाथ, शंकराचार्य स्थापीत , कामनाथ महादेव दर्शन झाले.

समुद्र स्नान ही झाले.


सनातन धर्माच्या वैश्विक कार्याच्या यशासाठी महादेवालाही गदगदा हलवले.तो ही प्रसन्न झाला.

इच्छा पुर्ती महादेव , कामनाथाचे ही दीव्य दर्शन झाले.


मागे दृष्टांत देऊन आण्णांनी दत्तासह दर्शन दिले अन् वैश्विक सनातन धर्माच्या कार्य सफलतेसाठी डोक्यावर गुरू दत्तात्रेय याच्या साक्षीने डोक्यावर वरदहस्त ठेवला व तुझे वैश्विक कार्य सुरू झाले आहे...असा आशीर्वाद ही दिला.


माझ्या लहानपणी माझ्या स्वप्नात नेहमी गुरूदत्त व अनेक देवी देवता यायचे.

माझ्या आण्णांना मी त्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की ,

तु शुद्ध आत्मा आहेस.त्यामुळे देवी देवता तुझ्यावर निरंतर शुद्ध प्रेम करतात.


दत्त जयंतीला मी मागे असाच दत्त मंदिरांमध्ये नारळ वाढवला असता त्यामध्ये तीन फुटी निघाल्या होत्या.


मागे असाच मी हिमालयात नैनिताल येथे हनुमान अवतारी नीम करौली बाबांच्या दर्शनासाठी गेलो होतो.

दिल्लीला दहा बारा दिवस काढले.व पुढे निम करौली साठी हल्द्वानीला गेलो.

तीथून नीम करौली.


पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले ,

तिकडे जाऊ नका , चार डिग्री टेंपरेचर आहे.थंडी सहन होणार नाही.


पण माझ्या मनाची धारणा अशी होती की...


देह गेला तरी चालेल पण तीथली साधना पूर्ण झाली पाहिजे.

जगातील अनेक मान्यवर तीथे येतात.

जगप्रसिद्ध होण्यासाठी.

वैश्विक कार्याच्या सफलतेसाठी.


तिथे मी निम करौली येथे कसा गेलो साधना पूर्ण कशी झाली,कसा परत आलो, कोणत्या अद्भुत आणि अदृश्य शक्तीने हे घडवून आणले , कांहीच समजले नाही.?


गीरनारला ही असेच झाले.जाणे अशक्य वाटत होते.

पण गेलो.

शिखरावरील दत्त प्रभुंचे दर्शन झाले.

आयुष्यात आणखी स्वर्गीय सुख काय हवे ?

दिव्य अनुभूती.

कसा गेलो कसा परत आलो कांहीच कळाले नाही.

कोणत्या अद्भुत अदृश्य शक्तीने हे सारे घडवून आणले कांहीच समजले नाही.


म्हणूनच गीरनारला जो जातो त्याच्या नरदेहाचे सार्थक नक्कीच होते.

साक्षात दत्त प्रभूंची भेट.


आपण ही गेला नसाल तर एक वेळ नक्कीच जाऊन या गीरनारला.

दत्त प्रभुंना भेटून या.

सुख दुःख सांगून या.

त्याच्या पाशी मन मोकळे हलके करण्यासाठी त्याला मनमोकळे बोला , मनसोक्त रडून घ्या.

आपले सुख दुःखाचे अश्रू त्याच्या चरणावर अर्पण करून या.


वाटल्यास पुढच्या वारीला मला सोबत बोलवा.तुमच्या मुळे मलाही दत्त प्रभुंना मला भेटता येईल.सुखदु:ख सांगता बोलता येईल.


वाट बघतो आहे तुमची.


आपले सगळ्यांचे मनोरथ दत्त माऊली पूर्ण करो.हीच दत्त प्रभू चरणी प्रार्थना.


अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

सद्गुरू आण्णा माऊली की जय.


🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

सोनारीचा काळभैरवनाथ