क्रौर्य

 *भक्त प्रल्हादाचे दुःख* 

✍️ २८१७


आईवडील आपल्या लेकराचे दोष अवगुण अनभीज्ञ पणे घडलेल्या चूका झाकून ठेवतात आणि आपलं लेकरू किती गुणवान आहे हे सगळ्यांनाच पटवून सांगतात.पण ? एखादं रत्नाची खाणं असणारं लेकरू , त्याची जर दस दिशांनी भयंकर बदनामी करतात , त्याचं जगणं मुश्किल करतात , त्याला आयुष्यातून , माणसातून , समाजातून , जीवनातून उठवण्यासाठी सतत अती भयावह कुटील डाव टाकून आपल्याच निष्पाप लेकराचं आयुष्य पार उध्वस्त करतात ? त्याला खरंच आई वडील म्हणावे का हो ? 


लेकरू अती भयानक मानसिक छळ वादांमुळे भयंकर आजारी पडलंय , सैरभैर झालंय , अगदी येडं होऊन फिरायला लागलंय ? मृत्यू च्या दारापर्यंत पोचलंय , संपूर्ण शुद्ध हरपलयं, अशावेळी...??

त्याला खंबीर मानसिक आधार द्यायचा सोडून , त्याला दवाखान्यात घेऊन जायचं सोडून, अशाही अवस्थेत त्याचा क्रूरपणे सामुहिक छळवाद करून, 

त्याचे उभे आयुष्य च उध्वस्त करने...

अशीही माणसे समाजात असतात...?

हे आश्चर्य आहे...


हे कपोल कल्पित नव्हे तर माझ्या डोळ्यासमोर घडलेली सत्य घटना होय...


भक्त प्रल्हादाचा महा भयंकर क्रूर बाप , महा राक्षस हिरण्यकश्यपू खरंच बाप म्हणण्याच्या लायकीचा होता का ?

महा भयावह, क्रूरपणे छळवाद केला हिरण्यकश्यपू याने आपल्या ईश्वर भक्त लेकराचा...

त्या भक्त प्रल्हादाला आपल्या बापाबद्दल थोडी तरी सहानुभूती वाटेल का ? 


आणी वर भक्त प्रल्हादालाच सगळे खलनायक ठरवत असतील आणी हिरण्यकश्यपू याला नायक तर ? हा कसला भयावह काळ आहे ?


आणी ? प्रल्हादाने ?  "माझ्या बापानं मला भयावह छळलं" एवढं जरी कुणा पाशी सांगीतलं की त्याच्या विरूद्ध भयावह आकांड तांडव ?


राक्षसी राज का अंत खुद ईश्वर ही *नारसिंह* 

बनकर करता ही है...


 *असो...* 🙏


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

सोनारीचा काळभैरवनाथ