मित्र
काही माणसं
आयुष्यात उशिरा येतात,
पण आल्यावर
वाटतं,
*यांचीच तर*
*वाट पाहत*
*होतो आपण.*
कधी न मागता
साथ देतात,
*कधी न*
*बोलताही मन*
*समजून घेतात.*
त्यांच्या एका छोट्याशा
काळजीत,
*आपल्याला*
*आपलेपणाचा*
*स्पर्श मिळतो.*
आयुष्याच्या गर्दीत
हरवलेलो असताना,
*ते अलगद हात धरून*
*सोबत चालतात.*
मग जाणवतं,
*उशीर झाला*
*म्हणून काय झालं.?*
*काही भेटी या*
*नशिबाने लिहिलेल्या*
*असतात.*
कारण काही
माणसं येतातचं
अशी की,
*त्यांच्या येण्याने संपूर्ण*
*आयुष्याला एक*
*सुंदर अर्थ*
*मिळतो.*
*❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞*
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment