शंखनादाचे फायदे

 शंखनादाचे वैज्ञानिक रहस्य..!


आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मात पूजेच्या वेळी शंखनाद केला जातो. शंखनादामध्ये प्रचंड रोगनिवारण शक्ती असते. शंख वाजवणाऱ्या व्यक्तीला श्वास रोखून धरावा लागतो, ज्यामुळे ही एक प्राणायमचीच  प्रक्रिया होते. ज्याचा सरळ प्रभाव फुफुसावर आणि श्वास प्रक्रियेवर होतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे फुफुसाचे किंवा श्वासाचे आजार होत नाहीत. 


शंखनादाच्या वेळी निर्माण होणाऱ्या शंखध्वनीच्या लहरी वायूमंडळात वेगाने प्रकम्पित होतात त्यामुळे दूषित किटाणूंचा सुद्धा नाश होतो.


अथर्ववेदात म्हंटलेलं आहे -


" शंखेन हत्वा रंक्षासि" ( अथर्व ४/१०/२)


अर्थातच, इथे सूक्ष्म किटाणूंना राक्षसाची उमपा दिलेली आहे आणि शंखनाद केल्यामुळे सूक्ष्म किटाणूंचा नाश होतो असे आपले अथर्ववेद म्हणतात.


कल्पना करा आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी डोळ्यासमोर किती वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून ह्या परंपरा निर्माण केल्या होत्या.पण आज ह्याच परंपरा आपण काळाच्या पडद्याआड लोटण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचीच मोठी किंमत आज आपल्याला चुकवावी लागतेय.!


सदरील फोटो डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने नक्की विचार करा, प्राचीन विज्ञानाचा आधार घेऊन कुठलेही फुफुसासंबंधी आजार होण्याआधीच शंखनाद करून स्वास्थ्य राहायचे की आजार झाल्यावर आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन स्पाइरोमीटर फुकत बसायच हे प्रत्येकाने ठरवावं..!

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस