चिमणीची लेकरं...

 चिमणीच लेकरू : - एक बोधकथा ( काल्पनिक )


लेखक : - विनोदकुमार महाजन

---------------------------------------

आटपाट नगर होत.नगराचा राजा,दयाळू, परोपकारी, पशूपक्षांवर प्रेम करणारा होता.

संपूर्ण मानवजातीसह पशुपक्षीही त्या राज्यात आनंदात रहात होते.


त्या राज्यातील एका गावातील एका झाडावर एका चिमणीन आपल्या पिलासाठी एक छानदार घरट बांधल होत.

घरट्यात पिलांचा चिवचिवाट असायचा.पिलांची आई चोचित खायला घेवून आली की ती पिल चिवचिवाट करून आईला साद द्यायची. आईच्या मायेच्या उबीन पिल हरखून जायची.


अन् एक दिवस नियतीने घात केला.पिलांची आई शिका-याच्या जाळ्यात अडकली.लेकराच्या आठवणीने त्या चिमणीच काळीज करपून गेल.

पण काय करणार ?

नियती फार क्रूर असते हेच खर.


इकडे चिमणीची पिल,चिमणी पाखरं आईची वाट बघून बघून होरपळून गेली. अन्न पाण्यावाचून तडफडू लागली. आणी एक दिवस ती चिमणी पाखरं आईच्या आठवणीने,अन्न पाण्यावाचून त्या इवल्याशा घरट्यात तडफडून तडफडून मरून गेली.


हुश्श...

दुर्देव चिमणिच.

दुर्देव पिलांच.


दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ.


मित्रांनो, चिमणीच्या पिलासारखी अनेक दु:खी,हतबल,अनाथ, निराधार, निराश्रित माणसं,पशुपक्षी या जगात असहाय ,नरकयातनेच जीवन जगत असतात. त्यांना आधार द्या.कमीत कमी त्यांच्या जखमेवर मीठ चोळायच तरी काम करू नका.चिमणीच्या पिलासारखी अनेक अनाथ, निष्पाप पाखरं या जगात असतात. त्यांना आधार नाही देता आला तरी चालेल पण त्यांच्यावर आघात करू नका.एकटे जीव नियतीच्या कचाट्यात सापडून आधीच तडफडत असतात. 


बोधकथा समाप्त.


हरी ओम्

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस