प्रेरणा

 निसर्ग, पशुपक्षी आपणास नेहमी प्रेरणा देत असतात. हा पक्षी बघा शहाळा स्वतः तोडून त्यातील पाणी पितो आहे.

मित्रांनो, जगात पशुपक्षी सुध्दा जिद्दीने जगतात. मग आम्हाला कठीण काय आहे ?

पाहिजे कल्पकता आणी तीव्र इच्छा शक्ती.


चला तर मग आपणही 

" शक्तीमान " ,होऊन ईश्वरी कार्य, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवू या.

हरी ओम्


विनोदकुमार महाजन


खालील पक्षाचे कार्य पाहून त्याच कौतुक जरूर करा.

आपल्या सद्गुणी मित्रांचेही वारंवार कौतुक करून प्रत्येकाला ईश्वरी कार्यासाठी प्रोत्साहित करा.

कौतुकामुळे नक्कीच बळ व आत्मविश्वास वाढतो.आणी त्याला पैसे ही लागत नाहीत. मनाचे थोडे मोठेपण असले की सगळे शक्य होते.

चला तर मग या पक्षापासून प्रेरणा घेऊन आपणही वैश्विक ईश्वरी कार्य आरंभ करू या.


ही तीस सेकंदाची ध्वनिचित्रफीत नीट पहावी. हा पक्षी नारळाच्या झाडावर बसून शहाळे तोडून, चोच आणि पायाच्या आधाराने त्याचे 'तोंड फोडून',तोंडात शहाळे उलटे करून 'संपूर्ण' पाणी पीत आहे. हे तो बहुधा त्याच्या आई बाबा कडून शिकला असावा!स्वत:च्या शरीर रक्षणापुरता स्वार्थ निसर्गाने (ईश्वराने) त्याला दिला आहे.'शहाळे' आहे का नाही हे अनेक माणसानाही सांगता येत नाही. पण यात त्याची कधी चूक होत नाही. तोडलेला नारळ हात नसूनही खाली जमिनीवर पडत नाही. चोच तर इतकी भक्कम की, हात नसतानाही झाडाच्या फांदीवरून नारळ खाली पडू न देता तो 'योग्य ठिकाणी चोचीने योग्य तेवढे फोडतो' आणि चोचीत धरून 'सर्व' नारळ पाणी, नारळ 'नीट उलटा करून' पिऊन टाकतो. आणि हे सर्व केवळ तीस सेकंदात!एवढे कौशल्य पाहूनही,त्यामागे लपलेली ईश्र्वरी शक्ती काही बुद्धिमान माणसांना दिसत नाही!यालाच बुद्धीचा अहंकार म्हणतात. आणि ज्याचा अहंकार नाहीसा झाला त्याला सर्वत्र सर्व वेळी ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार होत असतो. फीत पाहून नुसता आनंद होणे पुरेसे नाही. सुबुद्धीलाही चालना मिळावयास हवी असे वाटते.

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र