क्रिकेट

माझं बरचस लहापण खेड्यात गेल.तिथले खेळ म्हणजे ईटी दांडु,हुतुतु,सुर पारंब्या,खन खनहुतुतु,पाण्यात पोहतानाची शिवनापाणी ईत्यादी. क्रिकेट, खो खो हे खेळ आम्हाला नवीनच.
पण योगायोगाने तालुक्याच्या ठिकाणी शिकायला आलो.अन चेंडु फळी अर्थात बँट बाँल अर्थात क्रिकेट माहिती झाले.शाळेच्या मैदानात जेंव्हा क्रिकेच्या मँच व्हायच्या तेंव्हा मी ओपनर बँटस्मन म्हणून जायचो,अन धडा धडा सिक्सर, बाँड्री ठोकायचो.पण हा लोकप्रिय खेळ अंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे हे आम्हा मित्रांना कुणालाच माहीत नव्हत.
जेंव्हा राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मँच लोकं रेडीओवरुन तल्लीन होवून ऐकायचे,आनंदाने उड्या मारायचे,त्यात तल्लीन व्हायचे,त्यावेळी कळाल की हा आंतरराष्ट्रीय इंग्रज खेळ जगात किती लोकप्रिय आहे ते.
त्यावेळी हा खेळ म्हणजे लोकप्रियतेचा उच्चांक. सारी दुनीया येडी झाली होती ह्या खेळाने.
पण म्हणतात ना,अती तिथं माती.अगदी तस्सच झाल या खेळाचं.खेड्यातल्या भाषेत सांगायचं तर, समद गुळवणी झालं ह्या खेळाच.
कारण तसच घडल.टेस्ट मच,वन डे या बरोबरच ट्वेन्टी ट्वेन्टी आल,अन दररोजच्या मँचला लोक पण कंटाळून गेले.
आता तर लोकामध्ये जास्त उत्साह फक्त वर्ल्ड कपवरच राहिला. अशाप्रकारे ही अंतरराष्ट्रीय गेम ची लोकप्रियता आज ब-याच प्रमाणात कमी झाली.गावस्कर, तेंडुलकर, कपीलदेव या सारख्या दिग्गजांनी राष्ट्रीय-अंतर राष्ट्रीय किर्तीमान स्थापित करून देशाची लोकप्रियता उच्च कोटीला नेवुन ठेवली.
गावस्करांनी तर यावरमराठी सिनेमात लोकप्रिय गाणही म्हटल,"जीवन म्हणजे क्रिकेट राजा........!"
तर अस हे क्रिकेट आज म्हणावं तेवढ लोकप्रिय राहीलं आहे का?हा प्रश्न आहे.
--  विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र