मोबाईलनं दुनीया येडी केली की राव!!!

जवा बगाव तवा मोबाईल, आन् ज्याच्या हातात बगावं तर मोबाईल.....
मोबाईल!!!मोबाईल!!!
अन्....मोबाईल!!!
दुनीया समदी येडी केली की राव या मोबाईलनं।समद वाट्टोळ झालं,सत्यानाश झाला पुरता समद्या दुनीयेचा.
आरं लहान लेकरापस्नं ते पार म्हाता-यापर्यंत,समद्याच्या हातात मोबाईलच की रावं.
उठल्यापास्न झोपेपर्यंत.जेवताना मोबाईल, चालताना मोबाईल, प्रवासात मोबाईल, शाळेत मोबाईल, झोपताना मोबाईल.
कुणी रस्त्यातन चालताना मोबाईल वर बोलत बोलत चालतो,अन् धाडदिशी धडकतो की रावं दुस-याला.आन् वर पुन्हा ह्योच उलट भांडण करतो,"काय रं आंधळ्या दिसतं नाही का?नीट म्होर बगुन चलता येत नाही का?"
कमाल केली रावं या मोबाईलन्.
म्हातारी माणसं भी कानाला हेडफोन लावुन गाण्याच्या तालावर नाचत्यात की राव,धडाधडा या येडापाई.
मरणादारी बी मोबाईल. तोरणादारी बी मोबाईल.
एस.टी.त मोबाईल, रेल्वेत बी मोबाईल.घरी बी मोबाईल, दारी बी मोबाईल.
हुश्श.....
मोबाईल!!!
मोबाईल!!!
मोबाईल!!!
कधी आई लेकराच्या अंगावर वरडती,तर कधी पोरगं बापाच्या अंगावर खेकसतय् या मोबाईल येडापाई.
जय देव जय देव जय मोबाईल देवा.
आम्हा सर्वांना आता तुम्हीच सुखी ठेवा.
जय देव जय देव जय मोबाईल देवा.
-----------------------------
--  विनोदकुमार महाजन.

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस