भव्यदिव्य जीवन
*एक भव्यदिव्य जीवन* *जगावे...!!* ✍️ २८२३ *विनोदकुमार महाजन* ✅✅✅🎯🕉️ अगदी प्रत्येकालाच असे वाटत असते की... आपण छान , सुखी , आनंदी जीवन जगावे. एक उत्तुंग , भव्यदिव्य जीवन जगावे.यशाची उत्तुंग गरूड भरारी घेऊन यशाची अनेक शिखरे काबीज करावी. कुणाला पैशाने मिळणारी श्रीमंती , पैशाने मिळणारी सगळी सुखे हवी असतात. तर कुणाला खूप मोठ्ठ , भव्यदिव्य नाव कमवावं असं वाटत असतं. कुणाला सिनेमातील हिरो हिरोईन व्हायचं असतं तर कुणाला मोठ्ठा महाराज होऊन समाज हित साधायचं असतं. कुणाला मोठ्ठा क्रीकेटपटू व्हायला आवडतं. तर कुणी गबरगंड उद्योगपती होणं पसंत करतो. कुणाला मंत्री , आमदार , खासदार व्हायचं असतं. तर कुणाला कांहीं. जीवनात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. सुखाचं स्वप्न , यशाचं स्वप्न. प्रत्येकाचं स्वप्न अगदी वेगवेगळं असतं. आणी प्रत्येकाचं स्वप्न , प्रत्येकाचं ध्येय पुरं होईलच असं ही नसतं. पण प्रत्येक जण अगदी आपापल्या स्वप्न पुर्तीसाठी स्वतःला अगदी झोकून देत असतो. ध्येयवादी राहणं , स्वप्न पाहणं कांहीं वाईट नाही.पण त्याची पुर्तता करणं , स्वप्न पुर्तीसाठी सतत त्याचा पाठपुरावा करणं कठीण असतं. प्रत्ये...