*खरा साधू कसा* *ओळखावा ❓* ✍️ २७३९ ✅✅✅✅✅ उच्च कोटीचे वैराग्य हेच खरे साधूचे लक्षण होय. कसल्याही मोहपाशात न अडकता स्थितप्रज्ञ पणे समाजहितासाठी उभे आयुष्य निरपेक्ष पणे वेचणे हीच खरी साधूची खूण. पण अलिकडे झालंय कसं की , अवडंबर , ढोंगीपणा , भोंदूगिरी एवढी प्रचंड प्रमाणात वाढली आहे की , खरा साधू कसा ओळखावा ❓असा प्रश्न पडतो. शुद्ध अध्यात्म हरपून अध्यात्माच बहुतांशी प्रमाणात बाजारीकरण झालेलं आपणास जागोजागी पहायला मिळते आहे. मग अशावेळी खरा साधू ओळखायचा कसा ? ख-या साधुची अनेक लक्षणे असतात. जाहिरात बाजी न करता कार्याची गुप्तता राखून अव्याहतपणे समाजहितासाठी कर्तव्य करत , अखंडपणे निरपेक्ष भावनेने ईश्वरी सेवेत रत , समाजहीत दक्ष , मौन व एकांत प्रीय राहणे , कधीच कुणाकडूनही धनाची अपेक्षा न ठेवणे , फुटक्या तुटक्या झोपडीत व भाजीभाकरीतही सदैव समाधानी व आनंदी राहणे , शक्यतो मनुष्य वस्ती पासून दूर राहणे , एका ठिकाणी स्थिर न राहता , समाज हितासाठी देशाटन करणे , भटकंती करणे असे बरेच प्रकार साधूच्या जीवनात येतात. तसे पाहता साधूचेही अनेक प्रकार आहेत. हठ योगी , अघोर साधू , अवघड साधू , नागा साधू , नाथपंथी असे...