*बार्शीचा माझा भगवंत !!* ✍️ २४९४ *विनोदकुमार महाजन* पत्रकार 🕉🕉🕉🕉🕉🕉🕉 बार्शी.... एक साधारण लोकसंख्या असणार ,कमी पर्जन्यमान असणारं , दुष्काळी पट्यातील तालुक्याच गांव. बार्शीची लोक पण साधी , सरळ , सगळ्यावर भरभरून प्रेम करणारी ,सगळ्यांना आधार देणारी , दुस-याच्या सुखदू:खात धावून जाणारी , सभ्य माणसं. सभ्य माणसांचा गाव म्हणजे बार्शी . बार्शीची आडत व्यापार लाईन पण मोठी. बार्शी तस विशेष प्रसिद्ध आहे ते भगवंतासाठी. इथे लक्ष्मीसह साक्षात भगवंताचे आजही वास्तव्य आहे. अशी बार्शीकरांची विशेष श्रद्धा आहे. अंबरीश राजा , दुर्वास मुनी व भगवंताची इथे विशेष कथा सांगितली जाते. अंबरीश राजाच्या रक्षणासाठी साक्षात भगवंत इथे प्रकट झाले व आजही त्यांचे इथेच वास्तव्य आहे , असे इथले लोक समजतात. माझ्या लहानपणी मी माझ्या आजोबांसह बार्शीला शिकायला होतो तेंव्हाचा तो काळ , त्या आठवणी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवाव्या अशा आहेत. साक्षात स्वर्ग माझ्याजवळ चोवीस तास नांदत होता. सगळी स्वर्गीय सुखही इथे फिकी वाटतात , एवढं छान वातावरण , छान गांव . आनंदाचे डोही , आनंद तरंग. आजही त्या बालपणाच्या आठवणी जशाच्या तशा ताज्या तवा