कर्मगती
*कर्मगतीचे फेरे...* ✍️ २७५० *विनोदकुमार महाजन* 🎡🎡🎡🎡🎡 प्रत्येक मनुष्याला नेहमीच असे वाटते की , आपल्या जीवनात नेहमीच सुख, समाधान, शांती, आनंद ,धनाची प्राप्ती असावी. आपले एक छान जीवन असावे. प्रत्येकाचे सुखी जीवनाचे एक स्वप्न असते. आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी तो रात्रंदिवस धडपडत असतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. पण होते नेमके उलटेच.तो जसजसा सुखाची अपेक्षा करत जातो तसतसा सुखी होण्यासाठी अधिकाधिक धडपडतो.सुखी होण्याचे अनेक रस्ते शोधत राहतो. पण घडते ते नेमके उलटेच.तो सुख शोधण्याचा प्रयत्न करतो.पण दु:खाच्या गर्तेत नेहमी अडकत राहतो. एक दुष्ट चक्रव्यूह.या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी तो अहोरात्र धडपडतो.पण वरचेवर दु:खाच्याच खोल गर्तेत अडकत राहतो. कितीही प्रयत्नवादी राहूनही दु:खाचे फेरे , एक शापित जीवन यातून कांहीं सुटका होत नाही. अन् यामुळे मनाची हताशा , उदासिनता , एकाकीपण वाढत जाते. नेमके असे का घडते ? कर्मगती ! कर्मगतीचे फेरे फार भयंकर व विचित्र असतात मित्रांनो. संचित कर्म, प्रारब्ध. एक भयंकर शापीत जीवन. यातून कुणाचिही सुटका नाही. मनुष्य जन्म धारण करणा-या प्रत्येकाची. व म...