*हिमतीने जगणे....*  ✍️२६९४ सततचे अपयश , आजारपण , आर्थिक समस्या , अनाथपण , शत्रूपीडा , सामाजिक छळवाद , हे जवळजवळ प्रत्येकाच्या जीवनात घडतंच असतं . बराच वेळ आणी बरंचसं आयुष्य सुध्दा जवळ जवळ यातचं व्यर्थ जातं. तरीसुद्धा अथक प्रयत्न , धैर्य , संयम , ईश्वरी उपासना , विविध साधना याद्वारे वरील सर्व भयंकर विपरीत बाबिंवर सुध्दा विजय मिळवून आपलं इच्छित कार्य साध्य करता येत , हे अनेक महापुरूषांनी सिध्द करून दाखवलं आहे. कदाचित पुढचा काळ , तुम्हाला जे पाहिजे ते सर्वच साध्य होणारा असेल ,म्हणून सतत हिमतीने लढत राहीलं पाहिजे. हर हर महादेव.  *विनोदकुमार महाजन*