प्रेम
*प्रेम असे करावे...* ✍️ २८२७ *विनोदकुमार महाजन* 🌹🌹🌹🌹 प्रेम असे करावे की प्रेमासाठी वेडेपिसे व्हावे प्रेम असे करावे की प्रेमात सर्वस्व झोकून द्यावे प्रेम असे करावे की उभे आयुष्यच प्रेमासाठी वेचत रहावे प्रेम गुलाबासारखे सुंदर असावे गुलाबासारखे सुगंधी पण असावे प्रेम असे करावे की जन्मोजन्मी सोबतच रहावे जन्मोजन्मी एकमेकांना शोधत फिरावे तो देह सोडून गेला तरी जन्मोजन्मी त्याला शोधत रहावे आणी त्याच्या पुन्हा भेटीसाठी भगवंतालाही साकडे घालावे प्रेम राम हनुमानासारखे असावे कृष्ण अर्जुनासारखे असावे राधा कृष्णासारखे असावे मीरा कृष्णासारखे असावे रामदास स्वामी कल्याण स्वामी सारखे असावे आणी आण्णा बापू सारखे ही असावे प्रेम शुद्ध असावे पवित्र असावे निष्कपट , निस्वार्थी असावे नितल असावे तरल असावे प्रेमात आर्तता असावी प्रेमासाठी व्याकूळ होऊन जावे मोहमाया , धनदौलत ही त्यापुढे फिके दिसावे प्रेम असे असावे जन्मोजन्मी सोबत राहण्याचे त्यात पावि...