मोठी माणसं
*मोठी माणसं ?* ✍️ २७१९ 🤔🤔🤔 ------------------------ जो मनानं मोठा आहे तो मोठा . जो विचाराने मोठा आहे तो मोठा . जो स्वकर्तृत्वाने मोठा आहे तो मोठा . जो इतरांचं सुखदुःख समजावून घेतो तो मोठा . जो इतरांच्या सुखदु:खात सहभागी होतो तो मोठा . जो समाजाचं सुखदुःख समजावून घेऊन त्यांना आधार देतो तो मोठा . धनाने मोठा आहे पण मनाने छोटा तर ? तो मोठा कसा होईल ? म्हणुन धनाने मोठं असणं किंवा होणं महत्वाचं नाही तर मनानं मोठं , श्रीमंत होणं महत्वाचं आहे . त्यामुळे सगळेच धनी लोकं समाजातील सुखदुःख समजावून घेतात का ? समाजाला योग्य मार्गदर्शन करून सामाजिक सलोखा , आत्मीयता वाढवतात का ? म्हणूनच आत्मकेंद्री श्रीमंती घातक असते तर समाजामुख श्रीमंती तारक असते . आज समाजामुख श्रीमंत कमी आणि आत्मकेंद्री श्रीमंतच जादा दिसताहेत . श्रीमंत असावं . श्रीमंत असणं गुन्हाही नाही . पण परदु:ख शितल असणारी श्रीमंती नको तर परदु:ख समजावून घेणारी श्रीमंती असावी . मी बरेच श्रीमंत बघितले . पण बरेचसे मनाने कंगाल बघितले . धनाने आणि मनाने श्रीमंत असणारे विरळा . असे धनवान, आपण त्यांना शंभर फोन करा , मेसेज पाठवा , उत्तर देणार नाहीत....