Posts

विचार धन

 *विचार धन...*  १ ) जेंव्हा असत्य सत्याला जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करतं तेंव्हा ते सत्य अधिक शक्तिशाली , धारदार आणी घातक होतं आणी असत्याला कायम स्वरूपी नेस्तनाबूत करून टाकतं... २ ) साधुसंत नेहमी सांगतात की , नातिगोती सगळी खोटी आहेत.सगळा मोहमायेचा फाफटपसारा आहे.भगवंत हेच अंतिम सत्य आहे...हेच त्रिवार खरं आहे.... ३ ) लेकराची आतुरतेने वाट  फक्त आईच बघत असते , दूसरे कुणीही नाही... हे एक कटुसत्य आहे... माता महालक्ष्मी की जय ... ४ )  राजबिंड रूप , अमोघ कर्तत्वाची छाप , चेहऱ्यावर ईश्वरी तेज असणारं उत्तुंग व्यक्तित्व सुध्दा , सततच्या राक्षसी खेळामुळे , आणी छळामुळे कांही काळ का होईना पण काळवंडून जातंच जातं... उदाहरण ध्रूव बाळ...  *विनोदकुमार महाजन*

श्रीकृष्ण

 *प्रेमवीर श्रीकृष्ण हवा की* *धर्मवीर* *श्रीकृष्ण...??* ✍️ २८२८  *विनोदकुमार महाजन*  🌹🪷🌹🪷 एक श्रीकृष्ण  बांसुरीवाला... प्रेमवीर  मुरलीधर... एक श्रीकृष्ण  सुदर्शन चक्र धारी... धर्मवीर... तुम्हाला कोणता श्रीकृष्ण हवा आहे ? दोन्ही श्रीकृष्ण एकच  परंतु परिस्थिती अनुसार एकाच श्रीकृष्णाची दोन वेगवेगळी रूपे... एक प्रेमासाठी तहान भूक विसरून सर्वोच्च प्रेम करणारा तर ? दूसरा ? कर्तव्यकठोर होऊन  महाभारतासारखे भयंकर धर्म युद्ध करून  धर्म व सत्याचा अंतिम विजय करणारा व सदैव  जींकणारा  अजेय श्रीकृष्ण... आपण कोणत्या श्रीकृष्णावर प्रेम करता ? साहजिकच मनमोहन , मनमोहक , बांसुरीवाला श्रीकृष्ण  राधेबरोबरचा श्रीकृष्ण... कांहीं वैश्विक संस्थांनी बांसुरीवाला श्रीकृष्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवला... कृष्ण भक्त वाढले  कृष्ण भक्तिही वाढली  पण  वैश्विक स्तरावर धर्माचा , सत्याचा , सत्य सनातन धर्माचा विजय झाला का ? आजही वैश्विक स्तरावर बांसुरीवाला श्रीकृष्ण , राधेचा श्रीकृष्ण पुजला जातो पण ? सुदर्शन चक्र धारी श्रीकृष्ण किती पुजला जातो ? ह...

धर्मद्रोह्यांचे विष

 *बिषारी पिढी...???* 👆✍️ २८२६  *विनोदकुमार महाजन* ----------------- ( प्रत्येक धार्मिक हिंदुंनी हा महत्वपूर्ण लेख जरूर वाचावा.धर्म जागृती अभियानाचा तो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरेल.ज्यांना मराठी समजत नाही त्यांनी वरील लींक वर क्लिक करून आपल्याला हवी ती भाषा निवडून त्या भाषेत लेख जरूर वाचावा. )  *विषारी पिढी...* म्हणजे नेमके काय ? तर , हिंदू असुन ईश्वर निर्मित महान हिंदू धर्मात आणी हिंदुंच्या देशात जन्म घेऊन सुध्दा , सतत हिंदुविरोधी , हिंदू देवीदेवता विरोधी , हिंदू महापुरूषांविषयी सतत विषारी गरळ ओकत राहणे , आक्रमणकारी दुष्ट व विनाशकारी शक्तिंना सतत मदत करणे हे या विषारी बांडगुळांचे अगदी चोवीस तास काम असते. यांना देव , धर्म , संस्कृती , देश याच्याशी कांहींही घेणेदेणे नसते. त्यामुळे अशा समाज उपद्रवी व समाजाला कीड लागलेल्या व्यक्ती विरुद्ध जरी अत्यंत कठोर भाषेत लिहीले तरी ते अत्यावश्यकच ठरते . कारण सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज म्हणतात की , " *तुका म्हणे ऐशा नरा ,* *मोजून माराव्या* *पैजरा..."*  हे वाक्य किती सार्थक आहे पहा. एवढंच नाही तर तुकाराम महाराज आणखी पुढे जाऊ...

प्रेम

 *प्रेम असे करावे...* ✍️ २८२७  *विनोदकुमार महाजन* 🌹🌹🌹🌹  प्रेम  असे करावे की प्रेमासाठी वेडेपिसे व्हावे  प्रेम  असे करावे की  प्रेमात सर्वस्व झोकून द्यावे  प्रेम  असे करावे की  उभे आयुष्यच प्रेमासाठी वेचत रहावे प्रेम  गुलाबासारखे सुंदर असावे गुलाबासारखे सुगंधी पण असावे प्रेम  असे करावे की  जन्मोजन्मी सोबतच रहावे  जन्मोजन्मी एकमेकांना शोधत फिरावे  तो देह सोडून गेला तरी जन्मोजन्मी त्याला शोधत रहावे  आणी त्याच्या पुन्हा भेटीसाठी भगवंतालाही साकडे घालावे प्रेम  राम हनुमानासारखे असावे  कृष्ण अर्जुनासारखे असावे राधा कृष्णासारखे असावे  मीरा कृष्णासारखे असावे  रामदास स्वामी कल्याण स्वामी सारखे असावे  आणी  आण्णा बापू सारखे ही असावे प्रेम शुद्ध असावे  पवित्र असावे  निष्कपट , निस्वार्थी असावे नितल असावे तरल असावे  प्रेमात आर्तता असावी  प्रेमासाठी व्याकूळ होऊन जावे मोहमाया , धनदौलत ही त्यापुढे फिके दिसावे  प्रेम असे असावे  जन्मोजन्मी सोबत राहण्याचे त्यात पावि...

ध्रूव बाळ

 राजबिंड रूप , अमोघ कर्तत्वाची छाप , चेहऱ्यावर ईश्वरी तेज असणारं उत्तुंग व्यक्तित्व सुध्दा , सततच्या राक्षसी खेळामुळे , कांही काळ का होईना पण काळवंडून जातंच जातं... उदाहरण ध्रूव बाळ... विनोदकुमार महाजन

मोहमाया

 साधुसंत नेहमी सांगतात की , नातिगोती सगळी खोटी आहेत.सगळा मोहमायेचा फाफटपसारा आहे.भगवंत हेच अंतिम सत्य आहे...हेच खरं आहे.... विनोदकुमार महाजन

लेकरू

 लेकराची आतुरतेने वाट  फक्त आईच बघत असते , दूसरे कुणीही नाही... एक कटुसत्य... माता महालक्ष्मी की जय  विनोदकुमार महाजन