*जो सतत हवाहवासा...* *वाटतो....!!* ✍️२७२१ --------------- प्रेम म्हणजे नेमके काय असते....? एखादा व्यक्ती सतत आपल्याजवळ असावा , त्याच्याशी मनमोकळेपणाने , हक्काने बोलावे , गप्पा माराव्या , आपले सगळे सुखदुःख त्याला सांगावे . त्यानें हळुवारपणे आपल्या दु:खावर फूंकर घालावी , आपल्या प्रत्येक दु:खात त्याने खंबीर साथ द्यावी , आपण त्याच्यावरून व त्याने आपल्यावरून जीव ओवाळून टाकावा... हेच तर ते खरं प्रेम असते . शुध्द , पवित्र , निरपेक्ष . नातं कोणतंही असो , प्रेम मात्र पवित्र असावं , त्यात धोका ,छल ,कपट नको , असं प्रेम सतत हवंहवंसं वाटतं.... अगदी सगळ्यांना...मला , तुम्हाला...सगळ्यांना . पण साधारणतः घडतं काय तर ? आपण एखाद्यावर सतत ,चोविस तास पवित्र प्रेम करतो . आणी समोरचा रूक्ष निघतो . त्याला आपल्या प्रेमाशी , मनाशी कांहीच घेणदेणं रहात नाही . एकतर्फी प्रेम... म्हणून प्रेम हे दोन्हीकडूनही असावं लागतं . तर त्याची तळमळ कळते , आत्मीयता कळते . आणी अशी माणसं एकमेकाला आयुष्यभर हवीहवीशी वाटतात . भावाभावाचं प्रेम , मित्रप्रेम ,नवरा बायकोचं प्रेम हे असंच असावं . पण....? कलियुगात असं श...