आक्रित
जनहो, अस कस हे सगळच आक्रित घडल ? मानसाचं सगळ गणितच चुकल पैसा झाला मोठ्ठा माणूस झाला छोट्टा मानवाच्या छोट्याशा मेंदूत सगळ भलतच भरल नातीगोती छोटी झाली दया माया संपली ह्रदये सगळीच होरपळून गेली अस अस हे समदच आक्रित झाल ? अस कस हे समदच इपरीत झाल ? संस्कृती, संस्कार यांच धन संपल संध्याकाळी दिवेलागनीच शुभंकरोती संपल टिव्ही न सगळच वाटोळ केल अस कस हे सगळचं आक्रित झाल ? घराघरात भांडण पेटल, सत्ता, संपत्तीच सगळ्यांना येड येड की हो लागल सर्व सजीवामदी,चौ-यांशी लक्ष योनिमदी एकटा माणूस च का बिघडला ? माणूस धर्म च विसरून गेला पांडुरंगा, अस कसं हे समदच आक्रित झाल ? पंढरपूर नगरीत देवा हे घोर कलियुग पाहून तु बी डोळ का रं मिटल ? डोळ उघड देवा डोळ उघड मानसाच बिघडलेल गणित पुन्हा सावर मानवतेची इस्कटलेली घडी पुन्हा सावर धाव घेई बा ईट्टला धावत येई रे ईट्टला साधुसंताचे रक्षण करण्या धावत येई रे पांडुरंगा हरी ओम् विनोदकुमार महाजन